Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडकाकू-नाना आणि पवार साहेबांच्या विचारावर समाजकारणाला महत्त्व देणार, मतदार संघातल्या दिव्यांगांना आ.संदिप...

काकू-नाना आणि पवार साहेबांच्या विचारावर समाजकारणाला महत्त्व देणार, मतदार संघातल्या दिव्यांगांना आ.संदिप क्षीरसागरांच्या उपस्थितीत साहित्याचे वाटप

बीड (रिपोर्टर) राष्ट्रवादीचे सर्वासर्वे तथा पद्मविभूषण खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बीडचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी आज मतदार संघातील दिव्यांग बांधवांसाठी विविध साहित्यांचे वाटप केले. व्हिलचेअर, सायकल इ.उपयुक्त साहित्य दिले. सदरचा कार्यक्रम हा बीडच्या नाट्यगृहामध्ये आज सकाळी पार पडला. यावेळी खा.शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त नेहरू सेंटर वरळी मुंबई येथे संपन्न होत असलेल्या व्हर्चुअल रॅलीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. यावेळी नाट्यगृह खचाखच भरलेले होते. सदरच्या कार्यक्रमाचे साक्षीदार होत असल्याचा गर्व उपस्थितांमध्ये दिसून आला.
बीडच्या नाट्यगृहामध्ये आयोजीत कार्यक्रम प्रसंगी आ.संदिप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.उषाताई दराडे, ज्येष्ट नेते अ‍ॅड.डी.बी.बागल, जि.प.सदस्या रेखाताई रविंद्र क्षीरसागर यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या नेहरू सेंटर वरळीत सुरू असलेल्या व्हर्चुअल रॅलीचे थेट प्रक्षेपण यावेळी एलईडी वॉलवर दाखवण्यात आले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या कार्यक्रमात आ.संदिप क्षीरसागर यांच्या माध्यमातून मतदार संघातील दिव्यांगांना व्हिलचेअर, सायकल सह इ.साहित्याचे वाटप करण्यात आले. उपस्थितांना आसन व्यवस्थेसह नाष्टयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.क्षीरसागरांनी काकू-नानांच्या आर्शिवादाने राजकारणाबरोबर समाजकारणाची शिकवण आपल्याला दिली आहे. त्या दृष्टीकोनातून राजकारणापेक्षा समाजकारणाला आपण महत्व देत आलो आहोत. राष्ट्रवादीचे सर्वासर्वे खा.शरद पवार यांनी आपल्या 60 वर्षाच्या राष्ट्रीय कारकिर्दीत जो समाजसेवेचा वसा घेतला आहे तोच वसा आपण अंगीकारण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!