Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडस्व.गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहताना धनंजय मुंडे भावूक ,म्हणाले,स्व.अप्पांच्या बाबतीत जयंती,पुण्यतिथी असे शब्द...

स्व.गोपीनाथ मुंडेंना आदरांजली वाहताना धनंजय मुंडे भावूक ,म्हणाले,स्व.अप्पांच्या बाबतीत जयंती,पुण्यतिथी असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली

परळी (रिपोर्टर) स्व.अप्पांच्या बाबतीत जयंती, पुण्यतिथा असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली. अप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला वंचित उपेक्षीत शेतकरी कष्टकरी ऊसतोड कामगार यांच्या कल्याणाचा वसा आपल्यात आहे. तो जपूयात. पुढे नेऊयात. असे म्हणत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भावूक होत स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होत आदरांजली वाहिली.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती साजरी होत आहे. गोपीनाथ मुंडे हे बीड जिल्ह्याचे भूमिपूत्र असले तरी ते राज्याच्या आणि देशातील वंचित उपेक्षीतांच्या गळ्यातले ताईत आहेत. त्यांचे कार्य हे विशाल आहे. आज राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथील निवासस्थानी स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली अर्पण करत अभिवादन केले. यावेळी विनम्र अभिवादन अप्पा…असे म्हणत धनंजय मुंडे भावूक झाले होते. स्व.अप्पांच्या बाबतीत जयंती, पुण्यतिथी असे शब्द वापरण्याची वेळ नियतीने आमच्यावर आणली. अप्पा जरी आज आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला वंचित उपेक्षीत शेतकरी कष्टकरी ऊसतोड कामगार यांच्या कल्याणाचा वसा आपल्यात आहे तो जपूयात, पुढे नेऊयात. असे धनंजय मुंडेंनी यावेळी म्हटले.

Most Popular

error: Content is protected !!