Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeक्राईमबीडमध्ये अघोरी; उलट्या पकाच्या कोंबड्याचा बळी! लिंब,नारळ,हळद-कुंकू रस्त्या फेकले,फळांना सुया, दाबणा टोचल्या;...

बीडमध्ये अघोरी; उलट्या पकाच्या कोंबड्याचा बळी! लिंब,नारळ,हळद-कुंकू रस्त्या फेकले,फळांना सुया, दाबणा टोचल्या; काळ्या बाहुल्या, परिसरात भिती

बीड (रिपोर्टर) उरफट्या पखाचं गळ्या कापलेलं कोंबडं, नारळ, लिंबू, अगरबत्ती, हळद-कुंकू, सुया टोचलेले फळे, पिठाची कणीक यासह आदि कर्मकांडातले साहित्य अंकुश नगर लगत असलेल्या स्मशानभूमीच्या रस्त्यावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांत खळबळ उडाली आहे. सदरचा अघोरी प्रकार कोणी आणि केला? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून साहित्य जप्त केले. सदरचा प्रकार हा अंधश्रध्देतून घडल्याचे दिसून येत असले तरी याठिकाणी आज पक्षाच्या बळी दिला, या बळी देण्याच्या अंधश्रध्देतील अघोरी क्रियाने या भागात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

q6

अंकुशनगर भागातील स्मशानभुमीजवळ सकाळी काही नागरिकांना मयत असलेलं उरफट्या पकाचं कोंबडं, दहा नारळ, 50-60 लिंब, पपई, सुया यासह इतर साहित्य दिसून आले. सदरील हा प्रकार नेमका काय आहे हे पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. सदरची घटना ही अघोरी आणि दहशत निर्माण करणारी आहे. या अंधश्रध्देतून घडलेल्या अघोरी घटनेत पक्षाचा बळी देण्यात आला असून पिठाच्या कणीकेत आणि फळांमध्ये अनेक सुया दाबण टोचण्यात आल्याचे दिसून आल्याने हा प्रकार बळीचा आहे. या घटनेला ज्या कोणी व्यक्तीने अंजाम दिला असेल तो आणि हे कृत्य करण्यासाठी ज्या भोंदू बाबाने प्रोत्साहन दिले असेल त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ठाण्याचे नितीन सोनवणे, विकास यमगर, लिंबाजी महानोर यासह नगरसेवक रंजित बन्सोडे, अनिल पवार, डॉ.मयुर बारगजे, वाघमारे सह आदिंनी पाहणी केली. सदरील हा प्रकार अंधश्रद्धेतून केला असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा पोलीस करत आहेत. 

Most Popular

error: Content is protected !!