Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- ...यांच्या उर्जाचे इंगित सापडेल काय?

अग्रलेख- …यांच्या उर्जाचे इंगित सापडेल काय?

गणेश सावंत-9422742810

महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सुर्य प्रकाशा इतके स्वच्छ आणि राजकीय विजयासाठी गणिमीकावा करणारे नेतृत्व म्हणून मुंडे-पवारांकडे पाहिलं जातं. गेल्या सहा दशकाच्या राजकारणाचा इतिहास चाळला तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा परिघ या दोघांच्याच अवती-भोवती फिरतांना दिसून येतो. विद्यार्थी दशकापासून लढवय्या भूमिकेत असलेले शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे हे बहुजनांची पाठ राखणच नव्हे तर कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेत मजुर, दीन दुबळ्यांच्या भाकरीसाठी लढा उभारणारे अनन्य साधारण नेतृत्व आहेत. मुंडे हे भलेही बीड जिल्ह्याचे भुमिपुत्र असले तरी त्यांनी अवघ्या महाराष्ट्रातल्या वंचितांना एकवटले. शरद पवार भलेही पश्‍चिम महाराष्ट्रातले असले तरी बीड जिल्ह्याने पवारांना जेंव्हा-जेंव्हा संकटात सापडले तेंव्हा-तेंव्हा त्यांना बीड जिल्ह्याने सावरलेच म्हणूनच या दोनही मातब्बर नेतृत्वांच्या जन्मदिनाला आज बीड जिल्ह्यात अधिक महत्त्व प्राप्त असते. राज्याच्या राजकीय सारी पाटावर कितीही सोंगट्या कोणी टाकत असेल मात्र त्या सारी पाटावर लढणारे प्यादी नव्हे तर नेतृत्व करणारे बीड जिल्ह्यातीलच असतात. हे अनेक वेळा उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. दुर्दैवाने स्व.गोपीनाथ मुंडेंचे अकाली निधन झाले आणि बीड जिल्हाच नव्हा तर महाराष्ट्रातला वंचित पोरका झाला. मात्र त्यांचे जाज्वल्य विचार आणि लढा देण्याची धमक आजही कष्टकर्‍यात असल्याने या
पट्टीवडगावच्या पायलट
ला नतमस्तक होत जिल्ह्यात जिथं-जिथं अभिवादन केलं जात आहे, स्व.गोपीनाथ मुंडेंनी राजकारणात  स्थानिक स्वराज्य संस्थेपासून सुरूवात केली. पट्टीवडगावच्या जिल्हा परिषद गटातून निवडुण आल्यानंतर स्व.मुंडे मागे फिरले नाहीत. राज्यातले आणि देशातले अन्य नेते हे सातत्याने राजकारण करायचे मात्र धनंजय मुंडेंनी आधी समाजकारणाला महत्त्व दिले आणि नंतर राजकारण करतांना जादूच्या कांडी नावाचा गणिमीकाव्याचा डाव टाकायला वेळोवेळी सुरूवात केली आणि इथुनच आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते ते थेट देशाच्या केंद्रीय ग्रामविकास मंत्री होण्यापर्यंत आपली कर्तबगारी राज्याला आणि देशाला दाखवून दिली. स्व.मुंडे यांच्या राजकीय यशाच्या आलेखापेक्षा समाजकारणाचा आलेख हा अनन्य साधारण, अलौकीक म्हणावा लागेल. कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुर, दीन दुबळे,वंचित यांचे प्रश्‍न म्हणजे सत्त्याचे, न्यायाचे आणि हक्काचे समजुन त्या प्रश्‍नासाठी मुंडेंनी सातत्याने आवाज उठवला. शेटजी-भटजीचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला केवळ हिंदुत्त्वाच्या जोरावर सत्ता स्थापन करता येणार नाही. काही धर्ममार्तंडाच्या कर्मकांड करणार्‍यांच्या आणि धनीकांच्या जयजयकाराने सत्तेची पताका फडकणार नाही हे जेंव्हा उमजलं तेंव्हा उपेक्षित वंचितांचा आवाज बनु पाहणार्‍या या पट्टी वडगावच्या पायलटने अक्षरश: उभा महाराष्ट्रात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून पिंजुन काढला. शेटजी-भटजीच्या पक्षाला ओबीसीची झालर लावली आणि या माणसाने संघर्षशिल महाराष्ट्रात एक इतिहास घडवला. महाराष्ट्राच्या गादीवर शिवसेनेसह भाजपासारख्या हिंदुवादी विचारांच्या सरकारला बसवले. इ.स.1995 साली महाराष्ट्रात जे सत्तांतर झाले ते केवळ आणि केवळ स्व.गोपीनाथ मुंडेंच्या अठरापगड जातीला घेवून सर्वास पोटास लावणे या शिवरायांच्या विचारामुळेच हे नाकारता येणार नाही. स्व.मुंडेंचा विजयअश्‍व दौडत होता, या विजयअश्‍वाला लगाम लावण्याची कोणाची हिंमत उरली नव्हती. ही विजयी घोडदोड आणि स्व.मुंडेंचा जयजयकार पाहून काळही मुंडेंच्या विजयी मिरवणुकीमध्ये थयाथया नाचायचा. मात्र कुठं चुकलं या ब्रह्मांडात कष्टकरी, वंचितांनी चुक ती काय केली? 3 जुन 2014 ला गोपीनाथ मुंडेंच्या मिरवणुकीत नाचणारा काळ इतका निष्ठुर झाला अन् गोपीनाथ मुंडेंना आमच्यातून घेवून गेला. यमाला तिथे विजय मिळवता आला मात्र याच महाराष्ट्रात दुसर्‍या
सह्याद्रीसारख्या नेतृत्वाने
यमाला हुलकावनी दिली
पश्‍चिम महाराष्ट्रातल्या बारामतीत गेल्या 80 वर्षापुर्वी जन्मलेले शरदचंद्रजी पवार यांचा गेल्या 81 वर्षाचा इतिहास पहिला, चाळला तर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांच्या जाज्वल्य इतिहासाने आजची तरूण पिढी भारावून गेल्याशिवाय राहणार नाही. यशाचे आणि कर्तृत्वाचे इंगित काय? हे शरद पवारांच्या उभ्या आयुष्याकडे पाहिल्यावर त्या इंगिताचे कोडे सुटल्याशिवाय राहणार नाही. वयाच्या 20 व्या वर्षापासून राजकारण आणि समाजकारण करणारे शरद पवार हे देशातले सर्वात अनुभवी आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर सह्याद्रीच्या महाराष्ट्रात आणि हिमालयाच्या हिंदुस्तानात शरद पवारांचा गौरव पुर्णच उल्लेख करावा लागतो. इ.स.1967 व्या साली वयाच्या 27 व्या साली आमदार, 32 व्या वर्षी राज्याचे गृहमंत्री, त्यानंतर शिक्षणमंत्री, कृषीमंत्री, उद्योगमंत्री, 18 जुलै 1978 साली वयाच्या केवळ 38 व्या वर्षी देशातील सर्वात तरूण मुख्यमंत्री त्यानंतर पुढे तीन वेळा मुख्यमंत्री, देशाचे संरक्षण मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री असे अन्गणित राजकीय आणि सामाजिक हुद्यावर या माणसाने काम केले. आज 81 वर्षाच्या वयात असलेले शरद पवार त्यांच्या दिनचर्यने 21 वर्षाच्या तरूणालाही लाजवतात. आठवा 2019 ची विधानसभा निवडणुक आणि त्या निवडणूकीत ती सातार्‍याची सभा, ती आठवली की चांगल्या-चांगल्यालेल्यांना उरात धडकी भरती. हे झालं राजकारण समाजकारण करतांना, अर्थकारण करतांना कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजुर दीनदुबळे, वंचित, शोषित, विद्यार्थी, उद्योग, व्यवसाय असं कुठलही क्षेत्र शरद पवारांकडून सुटलं नाही. त्यामध्ये ते परींद नाहीत. एकदा राज ठाकरेंनी शरद पवारांचा किस्सा सागितला तेंव्हा राज ठाकरे म्हणाले, या माणसाकडे एवढी उर्जा येते कोठुन? यापुढे जात उभ्या साठ वर्षाच्या राजकारणामध्ये हा माणुस कोणाच्या हाताला लागलेला नाही. म्हणूनच शरद पवारांना तेल लावलेला पहिलवान म्हटलं जातं. माफ करा हा माणुस कॅन्सरसारख्या आजाराच्या हातालाही लागला नाही, तेथूनही निसटला. इथं मात्र काळाला पराभव स्विकारावर लागला. हे महाराष्ट्राचे सुदैव, शरद पवारांसारखा कर्तबगार नेता हा आमचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करतोय याचा आम्हाला अभिमान आणि स्वाभिमान असेलच. आज 81 व्या वाढदिवसानिमित्त शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या याच निमित्ताने कोटी-कोटी शुभेच्छा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! 

Most Popular

error: Content is protected !!