Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeबीडहे बोलघेवडं पदराखालचं पालकत्व नव्हे, महाराष्ट्र धर्मातल्या कर्तव्य-कर्मातलं पालकत्व

हे बोलघेवडं पदराखालचं पालकत्व नव्हे, महाराष्ट्र धर्मातल्या कर्तव्य-कर्मातलं पालकत्वआईचा काळीज घेऊन जाणार्‍या लेकराला ठेस लागली तरी आईचं काळीज ‘लागलं का रे लेकरा!’ असा साद घालते, असे प्रेम मातृत्वाचे आणि पितृत्वाचे असते, अशी शिकवण आणि संस्कार भारतीयांना आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा जो कोणी पालकत्व स्वीकारतो तेव्हा तेव्हा त्याच्या कर्तव्य-कर्माकडे मोठ्या आशेने पाहितलं जातं. कुठेही अश्रुंचा देखावा नाही, पुर्वजांच्या कर्तृत्वाचा डांगोरा नाही. कुठे पदराचा दाखला नाही, इमोशनल ब्लॅकमेलिंग तर नाहीच नाही. केवळ आपले हे कर्तव्य आहे, आपण ज्यांचं नेतृत्व करतो, ज्या राज्याचा नेतृत्व करतोय तिथं कर्तव्य कर्म करणे हेच आपला धर्म आहे. हे समजून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे पालकमंत्री या पदाला शोभेल, असे काम करताना दिसून येत असून जिथं जिथं जिल्ह्यातील नागरिकांना गरज पडेल तिथं तिथं वेळात वेळ काढून प्रत्यक्ष जावून तेथील नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याइरादे काम करत असल्याने बीड जिल्ह्याला कर्तव्य-कर्मालाच धर्म मानणारा पालकमंत्री मिळाला, असे गौरवोद्गार नागरिकातून व्यक्त होताना दिसून येत आहे.


   पद असो वा नसो बीड जिल्ह्यातील नागरिकांचे आपण जेव्हा नेतृत्व करत आहोत, अखंड महाराष्ट्राची जेव्हा आपण सेवा करत आहोत तेव्हा महाराष्ट्र धर्म हा कर्तव्य-कर्मातून पाळावा लागतो आणि हे कर्तव्य कर्म करताना भलेही कितीही संकट आले तरी त्या संकटांशी दोन हात करत आपल्या कर्तव्यपासून दूर जायचे नाही, कोणी आरोप केले, कोणी आळ घेतला तर डगमगायचे नाही, लोकांचे काम करत राहायचे ही भूमिका सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी समोर ठेवली. गेल्या वर्षभराच्या कालखंडात बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारणारे धनंजय मुंडे लोकांसमोर कधी रडत गेले नाहीत. पुर्वजांच्या कार्याचे दाखले देत आपलं नेतृत्व स्वीकारण्यास त्यांनी कोणाला भाग पाडलं नाही. मी पदराखाली घेईल, मीच तुमचा पालक असं पालकत्व त्यांनी कधी कोणावर लादलं नाही. डोळे पुसत इमोशनल ब्लॅकमेलिंग तर त्यांनी कधी केलीच नाही. परंतु आपण पालकमंत्री आहोत आणि पालकमंत्र्याचे काम हे जिल्ह्यातील जनतेच्या प्रत्येक प्रश्‍नाकडे स्वत:चा प्रश्‍न म्हणून लक्ष देणे हे आहे. जिल्ह्यातील कुठल्याही नागरिकाला कसलीच अडचण भासणार नाही, त्यांच्यावर कुठले संकट आले तर सर्वप्रथम त्या संकटाचा सामना करण्यासाठी स्वत:हून घटनास्थळी जाणे, दुर्घटनेमध्ये दुर्दैवी घटना घडलीच तर त्या कुटुंबियांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे, लेकी-बाळीची सुरक्षा करणे, त्यांचे लग्न कार्य करणे, कधी भाऊ तर कधी पालक म्हणून यांच्या डोक्यावर हात ठेवणे हे धनंजय मुंडेंनी सातत्याने केले. आष्टी तालुक्यात पिसाळलेल्या बिबट्याने उच्छाद् मांडला. दोघांचा जीव घेतला. अनेकांना जखमी केले. हे आठवडाभरात होत असताना काल दस्तुरखुद्द पालकमंत्री धनंजय मुंडे आष्टी तालुक्यात डेरेदाखल झाले. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या गर्जे कुटुंबियाच्या दु:खात सामील होत त्यांचे सांत्वन केले. नागनाथ माझा दाजी, माझ्या बहिणीची आणि त्याच्या लेकरांची जबाबदारी माझी म्हणत किन्ही गावच्या त्या लेकराच्या घरीही जावून पालकत्वाची जबाबदारी पार पाडली. पालकमंत्री आहे म्हणून नाही तर माणूस म्हणून आणि माझे कर्तव्य-कर्म म्हणून मी आपल्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे, आपल्या सुख-दु:खात सहभागी आहे असे म्हणत धनंजय मुंडेंनी आपलं कर्तव्य पार पाडलं. गेल्या एक वर्षाच्या कालखंडात जेव्हा केव्हा सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांना अडचण येईल तेव्हा तेव्हा त्यांच्या अडचणींसाठी धावून जाणारा नेता म्हणून धनंजय मुंडेंकडे पाहितलं जातं. महाराष्ट्राचा धर्म कर्तव्य-कर्म ते पाळण्याचं काम ना. मुंडेंकडून काटेकोरपणे केलं जातं.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!