Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमशाहूनगरमध्ये घरफोडी अडीच लाखाचा एैवज लंपास

शाहूनगरमध्ये घरफोडी अडीच लाखाचा एैवज लंपास

बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यात घर फोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहे. कालच अज्ञात चोरट्यांने बीड शहरातील जालना रोडवरील अ‍ॅटो मोबाईलचे दुकान फोडून दुकानातील 6 लाख 20 हजाराचे स्पेअर पार्ट चोरून नेल्याची घटना ताजी असतांनाच शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहू नगरमध्ये पुन्हा एक घर फोडी झाली असून तेथे रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 47 हजार 500 रुपये लंपास केले.

भाग्यश्री संघर्ष हाकाळे (रा.बाळराजे कॉलनी, महात्मा फुले मार्ग शाहू नगर ) यांच्या घरी काल रात्री अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत कपाटात ठेवलेले 2 लाख 47 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागीने व रोख सात हजार रुपये असा मुद्देमाल चोरुन नेला. सोन्याच्या दागिन्यामध्ये एक मिनी गंठण,झुंबर, वेली, अंगठी, मनी, पॅन्डल, चांदीचे जोडवे, चांदीची चैन यासह इतर एैवज लंपास केला. या प्रकरणी भाग्यश्री हाकाळे यांनी शिवाजी नगर पोलीसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!