Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडशारदा अँकडमीने दिलेल्या संधीचे सोने करा-अप्पर सचिव नितीन करीर

शारदा अँकडमीने दिलेल्या संधीचे सोने करा-अप्पर सचिव नितीन करीर


अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून गेवराईत स्पर्धा परिक्षा केंद्राचा शुभारंभ

गेवराई,(रिपोर्टर):- शारदा अँकडमीच्या माध्यमातून अमरसिंह पंडित यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी देण्यासाठी चांगली संधी उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचे सोने करुन तुम्ही चांगले अधिकारी होऊन समाजाची सेवा करा असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी तथा राज्याचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांनी केले. माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या संकल्पनेतून शहरात मोफत स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राचा शुभारंभ करताना ते बोलत होते.


ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी तथा राज्याचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या शुभहस्ते सोमवार, दि.13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता र.भ.अट्टल महाविद्यालय गेवराई येथे शारदा प्रतिष्ठान आणि र.भ.अट्टल महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा अकॅडमीच्या माध्यमातून मोफत स्पर्धा परिक्षा केंद्राचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जालन्याचे जिल्हाधिकारी विजय राठोड, प्रसिद्ध उद्योगपती मानसिंग पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमरसिंह पंडित यांनी अँकडमी सुरु करण्याची भुमिका विषद केली. यावेळी जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नितीन करीर यांनी आय. ए.एस. अधिकारी का व्हायचे हे आधी निश्चित केले पाहीजे. अमरसिंह पंडित यांनी एक चांगले काम उभे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रारंभी हेलिकॉप्टर अपघात शहिद झालेल्या विरांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विविध संस्थाचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, स्पर्धा परिक्षाची तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. समाधान ईंगळे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी मानले. राष्ट्रगिताने कारँयक्रमाची सांगता झाली.

Most Popular

error: Content is protected !!