Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडआजपासुन जिल्हा परिषदेच्या चार विभागाचा कारभार नव्या इमारतीतून

आजपासुन जिल्हा परिषदेच्या चार विभागाचा कारभार नव्या इमारतीतून


बीड (रिपोर्टर):- राजकीय शह-काटशहाच्या वादात उद्घाटना विनाच जिल्हा परिषदेच्या चार विभाग नवीन इमारतीमध्ये काल हस्तांतरीत करून आजपासून या ठिकाणावरून या विभागाचा प्रशासकीय कामकाज सुरूवात होणार आहे. यामध्ये बांधकाम क्र.1 आणि 2, पंचायत आणि सामान्य प्रशासन या चार विभागाचा समावेश आहे.

beed zp

जिल्हा परिषदेवर सेना-भाजपची सत्ता असतांनाच या इमारतीचे उद्घाटन करून कामकाज सुरू करण्याचा प्रयत्न त्यावेळी दोन वेळेस सत्ताधार्‍यांनी केला. फर्निचरचे रि-टेंडरींग आणि या इमारतीतील विद्युत व्यवस्था याचेही पुन्हा टेंडर करावे लागल्यामुळे ही दोन कामे त्यांच्या कालावधीत झाली नाही आणि इमारत उद्घाटनाचे प्रयत्न फोल ठरले. त्यानंतर पुन्हा जिल्हा परिषदेवर सत्तांतर होवून जिल्हा परिषदेमधील फर्निचरच्या कामाचे आणि विद्युत कामाची फेर निविदा काढण्यात आली. फर्निचर झाल्यानंतर विद्युत विभागाचे कामकाज सुरू असतांनाच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी इमारत उद्घाटनाची वाट न बघता आपल्या जिल्हा परिषदेचे चार प्रशासकीय विभाग या इमारतीमध्ये स्थलांतरीत केले. यामध्ये जिल्हा परिषदेचा महत्त्वाचा सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, बांधकाम क्र.1 व 2 अशा चार विभागाचे प्रशासकीय दप्तर काल हालवण्यात आले आहे. आजपासून या विभागाचा कामकाज या नव्या इमारतीतून होईल. नव्या इमारतीमधील बैठक व्यवस्था आणि फर्निचर ही अद्यावत असल्याने प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कामाला गती नक्कीच येईल. इमारत उद्घाटनाचे म्हणले तर सर्वच महापुरूषांच्या पुतळे या इमारत परिसरात बसवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि हे पुतळे बसल्यानंतरच राजकीय मुहूर्त साधून या इमारतीचे उद्घाटन होईल तेंव्हा होईल मात्र प्रशासकीय कामकाजाला सुरूवात झाली हे थोडे थोडके नव्हे.

Most Popular

error: Content is protected !!