Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडगेवराईनिराधारांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय उपोषण सोडणार नाही-आ.लक्ष्मण पवार

निराधारांचे प्रश्न मार्गी लागल्याशिवाय उपोषण सोडणार नाही-आ.लक्ष्मण पवार


निराधारांसोबत आ.पवारांचे उपोषण सुरू

गेवराई (रिपोर्टर) गेल्या तीन वर्षापासून मंजूर असलेले 11 निराधारांच्या अर्ज प्रलंबित असताना राजकीय दबावापोटी नवीन अर्जाला मंजुरी देत तहसीलदारांनी मागील प्रलंबित अर्ज फेटाळुन लावत निराधारांच्या तोंडाला पाने पुसले असून हे अर्ज का फेटाळले याचे योग्य करण देऊन नामंजूर केलेले सर्व अर्ज मंजूर करून निराधारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी हे आमरण उपोषण सोडणार नसल्याचे आ.लक्ष्मण पवार यांनी सांगितले. निराधारांच्या विविध प्रश्नी आ.लक्ष्मण पवार यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, मागील काळात आपण 11 हजार लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर केले असता. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी पुन्हा याबाबत खोटी तक्रार करुन स्थगिती देण्यास भाग पाडले. याबाबत आपण जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना वेळोवेळी विनवणी करूनही त्यांनी राजकीय दबावापोटी याबाबत कुठलीच दखल न घेतल्याने मी निराधारांसह तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून यावर तात्काळ योग्य निर्णय झाल्याशिवाय आपण माघार घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर राजकीय दबाव टाकून गोरगरीब जनतेचा सूड घेण्यासाठी हा खटाटोप करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम विरोधकांकडून होत आसून त्यांनी राजकीय सूड भावनेतून ठराविक गावातून आपल्या मर्जीनुसार बोगस लाभार्थी लावून राजकीय फायद्यासाठी हा सगळा खटाटोप असून त्यांना ही निराधार जनता माफ करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर खोट्या त्रुटी दाखवून रद्द केलेल्या अर्जावर आम्ही स्वतः तपासणी करून ज्या त्रुटी आहेत त्यांची पूर्तता करून सर्व अर्ज मंजूर करण्यास भाग पाडू असे त्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी जि.प.सदस्य पांडुरंग थडके, प्रल्हाद माने, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षभूवनकर, ऍड.सुरेश हात्ते, जे.डी. शहा, सभापती दीपक सुरवसे, पंचायत समिती सदस्य संजय जाधव, नगरसेवक भगवान घुंबारडे, अजित कानगुडे, जानमोहमद बागवान, सचिन मोटे, करण जाधव, अरुण मस्के, कृष्णा मुळे, राहुल खंडागळे, दादासाहेब गिरी, याहीया खान, महेश सौंदरमल, राम पवार, संजय इंगळे, मुन्ना शेठ, कृष्णा काकडे, सय्यद बदियोद्दीन, किशोर धोंडलकर, भारत गायकवाड, लक्ष्मण चव्हाण यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व निराधारांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!