Monday, January 24, 2022
No menu items!
Homeबीडआष्टी, वडवणीत भाजपाची डोकेदुखी वाढणार

आष्टी, वडवणीत भाजपाची डोकेदुखी वाढणार


आज दुपारनंतर पाचही शहरात लढ्याचे चित्र स्पष्ट होणार, केजमध्ये तिरंगी तर पाटोदा,शिरूरमध्ये दुरंगी लढत; शिवसेनेच्या उमदेवारांनाही महत्त्व येणार, ओबीसी आरक्षणाच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष
आष्टी/पाटोदा/शिरूर/वडवणी/केज (रिपोर्टर):- नगर पंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाचही शहरात नेतृत्वाचा उमेदवारी अर्ज वापस घेण्याच्या शेवटच्या दिवशी कस लागल्याचे दिसून येत असून आष्टीत धस विरूद्ध आजबे गटात सरळ लढत होत असली तरी भाजपातल्या नााराजांची मनधरणी करण्यात धसांना अटकेपार प्रयत्न करावे लागत आहेत. वडवणीत थेट भाजपाचे राजाभाऊ मुंडे विरोधात येथेही भाजपाची कोंडी होतांना दिसून होत आहे तर माजलगावात पाटील गटाविरोधात राष्ट्रवादी आणि जनविकास आघाडीने निवडणूक लढवण्याचे ठरवल्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होतांना दिसून येत आहे. पाटोदा, शिरूरमध्ये सरळ-सरळ राष्ट्रवादी विरूद्ध भाजप अशा लढती होत असतांना शिरूरमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांच्या गटाचे शिवसेनेकडून उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज तीन वाजल्यानंतर या पाचही नगर पंचायत निवडणुक लढ्याचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पुर्वी ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाबाबत होत असलेल्या सुनावणीकडेही राज्याचे लक्ष लागून आहे.

नगर पंचायत निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर ओबीसी आरक्षण रद्द बातल केल्याने बीड जिल्ह्यासह राज्यातील नगर पंचायत निवडणूक ओबीसी विना लढवली जाणार आहे. याबाबत आज न्यायालयात सुनावणी होत असून त्याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायतीच्या निवडणूका होत असून या पाचही शहरामध्ये कुठे तिरंगी तर कुठे दुरंगी लढती पहावयास मिळणार आहे. प्रामुख्याने आष्टी आणि वडवणीत भाजपाची डोके दुखी अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. आष्टीत आजबे विरूद्ध धस अशी लढत होत असली तरी या ठिकाणी धोंडे, पंकजा मुंडे, गटाचे नाराज इच्छुकांची मनधरणी सुरू आहे. त्यात यश आले तर ठीक नसता धसांना ती डोके दुखी ठरणार आहे. वडवणीत भाजपाचे माजी आ.आंधळे गटाने थेट राजाभाऊ मुुंडे यांच्या विरूद्ध आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांच्या सोबत निवडणूक लढवण्याचे ठरवल्याने येथे भाजप अडचणीत आले आहे. शिवसेनेने ही या ठिकाणी सात उमेदवार दिले आहेत. तिकडे केजमध्ये पाटील विरूद्ध राष्टणट्रवादी आणि जनविकास आघाडी निवडणूक रिंगणात उतरल्याने या ठिकाणी तिरंगी लढत पहावयास मिळणार आहे तर शिरूरमध्ये भाजपाविरूद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत असतांनाच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे शिवसेनेकडून पाच ते सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पाटोद्यातही राष्ट्रवादी विरूद्ध भाजपा अशी सरळ लढत होणार आहे.

वडवणी न.प.निवडणुकीतून
15 जणांची माघार

वडवणी नगर पंचायत निवडणुकीचे नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा आज शेवट दिवास असून दुपारी एक वाजेपर्यंत फक्त 14 जणांनी माघार घेतल्याचे वृत्त हाती आले असुन अपक्ष किंवा बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज टाकणाऱ्या उमेदवाराच्या विनवणीला वेग आला असल्याच दिसून येत आहे.तर तहसिल कार्यालयाच्या प्रंगणात जत्रेचे स्वरुप असल्याच दिसून आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!