Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeबीडपिसाळलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी जोगेश्वरी पारगांव येथील महिला ठार

पिसाळलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी जोगेश्वरी पारगांव येथील महिला ठार

पांगुळगव्हाण येथील शेतकरी प्रसंगसावधनाने हल्ल्यात बचावले

नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत कायम तात्काळ जेरबंद करण्याची मागणी

आष्टी ( रिपोर्टर ) :- अक्षय विधाते

तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून जोगेश्वरी पारगांव येथे याच परिसरात सकाळी ११ च्या दरम्यान बिबट्याने ६५ वर्षीय महिलेवर हल्ला केला होता पुन्हा याच परिसरात बिबट्याने सायंकाळी कापूस वेचून परतत असताना महिलेवर हल्ला केल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. २९ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास उघडकीस आली याचवेळी पांगुळगव्हाण येथील शेतकरी शहाजी तात्याबा गिते यांच्यावर बिबट्याने झडप घातली झडप अपूरी पडल्याने ते बचावले तालुक्यात बिबट्याचे हल्ल्याचे सत्र सुरूच असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील किन्ही येथील बालकाचा तर सुरुडी येथील शेतक-याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झाल्याच्या घटना ताज्या असतानाच सकाळी ११ च्या दरम्यान जोगेश्वरी पारगाव येथे गवत काढणाऱ्या शालन भोसले (वय-६५) या महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता.यामध्ये त्या महिलेच्या गळ्यावर बिबट्याचे नखे लागली होती.मात्र त्या महिलेच्या पुतण्या आणि सुनेने धाडस करून बिबट्याच्या तावडीतून महिलेची सुटका केल्यानंतर याच परिसरात पुन्हा सायंकाळी ६ च्या दरम्यान सुरेखा निळकंठ बळे (भोसले) वय ५० महिला एकटी कापूस वेचुन घरी परतत असताना बिबटयाने केलेल्या हल्ल्यात जागिच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.जोगेश्वरी मंदिराच्या जवळ असणाऱ्या बळे वस्तीवर ही घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.याच दरम्यान पांगुळगव्हाण येथील शेतकरी शहाजी गिते यांच्यावर हल्ला करण्याचा बिबट्याने प्रयत्न केला सुदैवाने बिबट्याची झडप अपूरी पडली यात ते बचावले घर जवळ असल्याने घराकडे धाव घेतली ते शेतात मका कापत होते.याबाबत वनविभाग पोलिस प्रशासनास कळवण्यात आले असल्याचे सरपंच हरिभाऊ गिते यांनी सांगितली आहे.

घटनास्थळी आ. सुरेश धस,सतिश शिंदे,जयदत्त धस दाखल झाले असून सरपंच तात्यासाहेब कदम,उपसरपंच अण्णासाहेब भोपळे घटनास्थळी आहेत.वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठाण मांडून आहेत.परंतु मागिल चार दिवसापासून वनविभागाला बिबट्या पकडण्यात यश न आल्याने हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करुन जेरबंद करा अन्यथा गोळ्या घालण्याची परवानगी घ्या अशी मागणी भाजपा तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,सरपंच तात्या कदम यांनी केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!