Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeबीडदुबार घरकुलाचा लाभ घेतलेले नावे वगळण्याची मोहीम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरू

दुबार घरकुलाचा लाभ घेतलेले नावे वगळण्याची मोहीम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत सुरू


बीड (रिपोर्टर)- 2022 पर्यंत घरकुल योजनेअंतर्गत पंतप्रधान निवास योजना राबविली जाते. गेल्या चार महिन्यांपासून या घरकुल योजनेत ज्यांची ज्यांची नावे आलेली आहेत त्या सर्वांची क्रॉस तपासणी ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमार्फत झाल्यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत आलेल्या यादीतून ज्यांनी यापुर्वी घरकुलाचा लाभ घेतलेला आहे त्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आतापर्यंत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी तीन तालुक्यातच किमान एक हजार ते बाराशे लाभार्थी हे दुबार घरकुलाचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांची नावे वगळण्यात येत आहेत. ज्यांची नावे पंतप्रधान निवास या यादीमध्ये आहेत त्या प्रति लाभार्थ्याची क्रॉस तपासणी होत आलेली आहे. यामध्ये जिल्हा ग्राम यंत्रणेने 13 निकष दिले होते. त्यात प्रामुख्याने या लाभार्थ्यांना स्वत:चे पक्के बांधकाम केलेले घरकुल नसावे, त्याच्याकडे शेती नसावी, चारचाकी किंवा वाहन नसावी, भ्रमणध्वनीही नसावा, अशा किचकट अटी होत्या. या अटीतून अनेक लाभार्थी पात्र होऊन याची यादी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आली होती. त्या यादीतील नावांपैकी तीन तालुक्यातील लाभार्थी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने शोध घेतला असता या यादीत दुबार लाभ घेत असल्याचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आढळून आले. यामध्ये रमाई घरकुल योजना असेल, शबरी घरकुल योजना, इंदिरा आवास योजना अशा स्वरुपाचा लाभ घेतलेले लाभार्थी आहेत. या वेळेस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून अल्पसंख्याक, मागासवर्गीय अशा प्रकारची वर्गवारी या योजनेत करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!