घटनास्थळी सपोनि महादेव ढाकणे,अंभोरा पोलीसांची धाव
आष्टी ( रिपोर्टर):- आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्याअंतर्गत बोरोडी येथील इलेक्शनचा जुना वाद डोक्यात ठेवत गाडीला कट मारल्याच्या कारणावरून २ गटात तुंबळ हाणामारी झाली यात एकमेकांना लाथाबुक्क्यांनी काठीने जखमी करण्यात आले यामध्ये ४ जण जखमी झाले आहेत.हि घटना २२ नोव्हेंबर रोजी घडली आहे.अंभोरा पोलिस ठाण्यात ८ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सपोनि महादेव ढाकणे यांनी रिपोर्टर शी बोलताना दिली आहे
.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या बोरोडी गावात जुना इलेक्शन काळात वाद चांगलाच पेटला मोटारसायकल ला कट मारल्याच्या कारणावरून २ गटात तुंबळ हाणामारी झाली ३६ वर्षीय महिला व ३ पुरुष ३० वर्षाचे आतिल हे जखमी झाले आहेत.देविदास बजरंग कराळे यांच्या फिर्यादीवरून बिबिषण प्रभाकर कराळे,प्रतीक बिबीशन कराळे, घनश्याम विठोबा कराळे, प्रसाद श्रीधर कराळे, भाऊसाहेब मल्हारी कराळे,अभिषेक भाऊसाहेब कराळे,आदित्य भाऊसाहेब कराळे, ज्ञानेश्वर प्रभाकर कराळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भडके हे करीत आहेत