Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडअखेर मुहूर्त सापडला 260 वस्तीगृहे सुरू

अखेर मुहूर्त सापडला 260 वस्तीगृहे सुरू


बीड (रिपोर्टर) तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीनंतर ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी जिल्ह्यात 260 वस्तीगृहे सुरू झाल्या आहेत. सर्वेक्षण अंती 393 ही वस्तीगृहे सुरू करावी लागतील, असा प्रस्ताव सर्व शिक्षा अभियानाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवला होता. कालपर्यंत या 393 वस्तीगृहेपैकी 260 वस्तीगृहे सुरू झाले आहेत.


प्रत्येक वर्षी ही हंगामी वस्तीगृहे नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच सुरू होत असतात. मात्र सर्व शिक्षा अभियानाच्या सर्वेक्षणाची गती मंद असल्यामुळे ही वस्तीगृहे सुरू होण्यासाठी तब्बल दीड महिन्यानंतर मुहूर्त लागला आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यात 260 वस्तीगृहे सुरू झाले आहेत. या वस्तीगृहातील एका विद्यार्थ्याला दोन वेळच्या जेवणासाठी प्रतिमहिना शालेय समितीला 1 हजार रुपये इतके मानधन मिळते. जे विद्यार्थी वस्तीगृहात नावनोंदणी करतात त्या विद्यार्थ्याची सकाळी आणि संध्याकाळी बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी नोंदवावी, असे आदेश असताना या आदेशाला मात्र शालेय समिती प्रत्येक वर्षी हरताळ फासते. गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत तपासणी आणि बील काढण्याची प्रक्रिया होत असल्याने यामध्ये शालेय समितीचे मोठ्या प्रमाणात फावते. प्रत्येक वर्षी तपासणीसाठी राज्यस्तरावर मात्र त्याच त्याच अधिकार्‍यांची टिम कशामुळे येते, त्यामुळे या वर्षी शिक्षण प्रेमी नागरिकांनी या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांच्या वस्तीगृहाची तपासणी महसूल विभागाच्या त्रयस्त यंत्रणेमार्फत व्हावी, अशी मागणी होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!