Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडजिल्हा रुग्णालयात अनोळखी इसमाचा मृत्यू

जिल्हा रुग्णालयात अनोळखी इसमाचा मृत्यू


बीड (रिपोर्टर) जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार घेणार्‍या एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला असून सदरील इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पंधरा दिवसांपुर्वी एका इसमाला वडवणी येथून कोणीतरी आणून जिल्हा रुग्णालयात अ‍ॅडमिट केले. उपचारा दरम्यान या इसमाचा आज मृत्यू झाला असून सदरील या इसमाजवळ कोणीही नाही. इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Most Popular

error: Content is protected !!