Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडशिरूर‘गांधी लढले गोर्‍यांशी, शिरूर कासारकरांची लढाई चोरांशी’, प्राजक्ता तनपुरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या...

‘गांधी लढले गोर्‍यांशी, शिरूर कासारकरांची लढाई चोरांशी’, प्राजक्ता तनपुरेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रचाराचे नारळ फुटले


शिरूर कासार (रिपोर्टर) नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ नगरविकास मंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्या उपस्थितीत ग्रामदैवत कालिका देवी व सिद्धेश्‍वरा चरणी नारळ वाढवून करण्यात आला. या वेळी व्यासपीठावरील उपस्थितांनी थेट सुरेश धसांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत शिरूरच्या विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याचे सांगितले. गांधी लढले गोरेंशी, शिरूर कासारकरांची लढाई मात्र चोरांशी असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला बहुमताने निवडून देण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.


आज दुपारी शिरूर येथे नगरविकास मंत्री प्राजक्ता तनपुरे, आ. निलेश लंके, आ. बाळासाहेब आजबे, माजी आ. रामकृष्ण बांगर, रा.यु.काँ.चे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायत या लुटमार करण्यासाठी धसांनी आपल्या गुत्तेदारांना दिल्या. लोकांना भीती दाखवण्यासाठी भाजपाने ईडीचा वापर केला, आता त्यांचाच नेता ईडीच्या रडारवर असल्याचे म्हटले तर महेबूब शेख यांनी गेल्या निवडणुकीत घडीवर निवडून आलेले पुन्हा तिकडे गेले. आता या निवडणुकीत तरुण चेहर्‍यांना संधी देण्यात आली असून पस्तीसच्या आतील 12 तर 5 ज्येष्ठांना उमेदवारी दिल्याचे सांगत जुने लोक देवाला पैसे, जमीन दान करायचे मात्र आमच्याकडे एक आमदार देवाच्या जमीनीवर दरोडे टाकत असल्याचे म्हटले. तर आ. बाळासाहेब आजबे यांनी एका आष्टी शहरात झाडे लावण्यासाठी 45 लाख रुपये घातले, 45 लाखात जंगल झालं असतं. विरोधक हे केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी असल्याचे म्हटले. तर आ. निलेश लंके यांनी भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू हा मतदारसंघ असल्याचे सांगत गेल्या पाच वर्षांमध्ये नुसता भ्रष्टाचारच झाला. आमचं नेतृत्व जनता आहे. जनता नक्कीच विकासाची गंगा शिरूर शहरात आणील, असा विश्‍वास वाटतो, तरुणांकडे जी ऊर्जा असते त्याचा उपयोग करून घ्या आणि गावच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या पॅनलला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!