Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमभरदुपारी 4 वा. बीडच्या बसस्थानका एचडीएफसी बँकेसमोर तरुणाचा खून

भरदुपारी 4 वा. बीडच्या बसस्थानका एचडीएफसी बँकेसमोर तरुणाचा खून

बीड (रिपोर्टर): आज दुपारी 4 वा. बीड शहरात थरार उडवून देणारी घटना घडली. अज्ञात तीन ते चार जणाच्या टोळक्याने एका 24 वर्षीय तरुणावर सशस्त्र हल्ला चढवला. तरुणाच्या अंगावर तलवारीसह अन्य धारदार शस्त्राने वार केल्याने सदरील तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला उपचारार्थ बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. सदरची घटना बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेसमोर घडली. बीड शहरातील खासबाग भागात राहणारा 24 वर्षीय शेख शाहिद शेख सत्तार या तरुणावर आज दुपारी 4 वा. बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेसमोर तीन ते चार तरुणांनी धारदार शस्त्राने वार केले. दिवसाढवळ्या सशस्त्र हल्लेखोरांनी तरुणावर सपासप वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. हल्लेखोर कोण? याचा शोध पोलीस घेत असून एका संशयीताला ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. सदरची घटना का व कशासाठी घडली हे अद्याप समजू शकले नाही.

Most Popular

error: Content is protected !!