Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडतांबे कुटुंबियांना 68 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

तांबे कुटुंबियांना 68 लाख रूपये नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश


बीड (रिपोर्टर):- तब्बल साडेचार पाच वर्षांपूर्वी एसटी अपघातात प्राण गमवावे लागलेल्या बीड येथील विधीज्ञ सचिन तांबे यांच्या कुटुंबियांना महामंडळाने 68 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश बीडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांनी दिले.विशेष बाब म्हणजे अपघाती मृत्यू प्रकरणात एवढी मोठी नुकसान भरपाई मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग असून यासाठी एक रुपया मानधन न घेता वकील संघाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.
बीड वकील संघाचे तात्कालिन सदस्य असलेले अ‍ॅड.सचिन जालिंदर तांबे यांचे दि.20 ऑगस्ट 2016 रोजी एस.टी.अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. त्यांचे अपघाती मृत्यु संदर्भात बीड वकील संघाचे तत्कालीन अध्यक्ष अ‍ॅड.मंगेश पोकळे यांनी वकील संघाचे प्रॅक्टिसिंग अ‍ॅड.सचीन तांबे यांचे वतीने त्यांचा अपघाती नुकसान भरपाई मिळण्याचा अर्ज नोंद होऊन त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायमूर्ती अनिल पानसरे यांचेकडे केली.
त्यावरून न्यायमूर्ती श्री.पानसरे यांनी पोलीस पेपर्स वरून नुकसान भरपाई अर्ज दाखल करून घेतला. सदर प्रकरण तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश व सध्याचे माननीय न्यायमूर्ती अनिल पानसरे, तत्कालीन प्रमुख जिल्हा न्यायाधीश प्राची कुलकर्णी तसेच अंजु शेंडेआणि सदर प्रकरणाचा निकाल प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत महाजन यांचे समोर चालले व निकाली लागले. सदर प्रकरणात संपूर्ण पुरावा व दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून व आलेला पुरावा ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा न्यायाधीश महाजन यांनी अ‍ॅड.सचीन तांबे यांचे अपघाती मृत्यू बाबतचा नुकसान भरपाई अर्ज मंजूर करून त्यांचे कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून रक्कम रुपये 68,20,000 व त्यावर 8% व्याजासह मंजूर केला. सदर प्रकरणात अ‍ॅड.सचीन तांबे यांचे वारसा कडून अ‍ॅड.मंगेश पोकळे सर, अ‍ॅड.सतीश गाडे यांनी प्रकरण विनामोबदला चालवले. त्यांना अ‍ॅड.राजेश जाधव, अ‍ॅड.विवेक डोके, अ‍ॅड.श्याम शिंदे, अ‍ॅड.सागर नाईकवाडे, अ‍ॅड.अमोल नाटकर, अ‍ॅड.संस्कार शिनगारे, अ‍ॅड.रोहन औटे, अ‍ॅड.कृष्णा आवारे, अ‍ॅड.दिपक गायकवाड यांनी सहकार्य केले. तसेच बीड जिल्हा न्यायालयातील तमाम वकील बंधू भगिनींचे सहकार्य लाभले. बीड जिल्ह्यातील वकील बांधवाच्या वारसांना अपघाती मृत्यू बद्दल एवढी मोठी नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल आत्मिक समाधान व आपल्या वरील जबाबदारीचे उत्तरदायित्व निभावता आले, असे उदगार सदर निकालानंतर अ‍ॅड.मंगेश पोकळे यांनी केले. व समाधान व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!