Friday, January 28, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईटीईटी परीक्षेत डमी परीक्षार्थी? म्हाडा पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे

टीईटी परीक्षेत डमी परीक्षार्थी? म्हाडा पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे


मुंबई (रिपोर्टर) म्हाडा पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. म्हाडा पेपरफुटीप्रकरणी तपास करत असताना पुणे सायबर पोलिसांना टीईटी परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आरोप घर झडतीमध्ये टीईटी परीक्षे संदर्भातील कागदपत्रे सापडली आहेत. त्याशिवाय परीक्षार्थींची काही ओळखपत्रेही सापडली आहेत. त्यामुळे आता म्हाडा पेपरफुटी प्रकरण हे घोटाळ्याचे हिमनगाचे टोक ठरणार असल्याची चर्चा आहे.


म्हाडा पेपरफुटीनंतर पुणे सायबर पोलिसांनी आपला तपास वेगाने सुरू केला आहे. टीईटी परीक्षेत डमी बसवण्याचा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरोपी प्रीतेश देशमुखच्या पिंपरी-चिंचवड येथील घरात छापा टाकला असता पोलिसांना टीईटी परीक्षेची ओळख पत्र मिळाले. त्यामुळे शिक्षक भरती परीक्षेचा पेपर देखील त्यांनी फोडला की काय अशी शंका निर्माण झाली आहे. पुणे पोलिसांची काही पथके वेगवेगळ्या ठिकाणी गेली असून त्या ठिकाणी तपास सुरू असल्याची माहिती आहे. म्हाडा भरतीचा पेपर फुटणार असल्याची कुणकुण आधीच लागली होती. त्यामुळे १० डिसेंबर रोजी पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून पेपर होण्यापूर्वीच काही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांना त्यांच्याकडे म्हाडाचे पेपर देखील सापडले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!