Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडवाळुचा टिप्पर पकडला

वाळुचा टिप्पर पकडला

बीड (रिपोर्टर)- चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम वाळु उपसा होत आहे. याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत असून काल स्थानिक गुन्हे शाखेने अवैध वाळु घेऊन जाणारा टिप्पर गुळज फाटयावर पकडला. बीडमधून स्थानिक गुन्हे शाखेला तिथले वाळु माफिया दिसतात मात्र स्थानिक पोलीस तेथे असताना कशात मश्गुल असतात असा प्रश्‍न उपस्थित होतो.


चकलांबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळु उपसा आणि त्याची वाहतूक होते. काल एक टिप्पर (क्र. एम.एच. २३ ए.एक्स. ४८७२) हे अवैध वाळू घेऊन राक्षसभुवन मार्गे जात असताना स्थानिक गुन्हे शाखेला ते दिसले. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून गुळज फाट्यावर ताब्यात घेऊन चकलांबा पोलिसांच्या ताब्यात दिले. या वेळी टिप्पर चालक मालक विलास उत्तम शिंदे (रा. शेवगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय भगतसिंग दुल्लत, एएसआय जायभाये, पो.ना. विकास वाघमारे, राहुल शिंदे, मनोज वाघ, सोमनाथ गायकवाड यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!