Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडखासगीकरणाच्या विरोधात बँकांचा दोन दिवस संप, राष्ट्रीयकृत बँकांतील व्यवहार ठप्प, कर्मचार्‍यांचे आंदोलन

खासगीकरणाच्या विरोधात बँकांचा दोन दिवस संप, राष्ट्रीयकृत बँकांतील व्यवहार ठप्प, कर्मचार्‍यांचे आंदोलन


बीड (रिपोर्टर) हमारी युनियन हमारी ताकत यासह इतर घोषणा देत राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचार्‍यांनी एसबीआय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. केंद्र सरकारने बँकांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने बँक कर्मचार्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. खासगीकरणाच्या विरोधात कर्मचार्‍यांनी आज आणि उद्या संप पुकारला. या संपामुळे राष्ट्रीयकृत बँकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. आजच्या या आंदोलनात सर्व कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला आहे.

केंद्र सरकार राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या विचाराधीन आहे. केंद्राच्या या निर्णयाचा कर्मचार्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. केंद्राने बँकांचे खासगीकरण करू नये, आपला निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी आज राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचार्‍यांनी संप पुकारला. आज आणि उद्या सर्व बँका बंद राहणार आहेत. कर्मचार्‍यांनी नगर रोडवर असलेल्या एसबीआय बँकेच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकारचा जाहीर निषेध, ‘हमारी युनियन हमारी ताकत’ यासह इतर घोषणांनी बँकेचा परिसर दणाणून गेला होता. दोन दिवस बँका बंद असल्याने संपुर्ण व्यवहार ठप्प झाले होते.

Most Popular

error: Content is protected !!