Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home बीड पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवडे पाटील यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवडे पाटील यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

 

पिंपळनेर – रिपोर्टर .

बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवाडे पाटील यांचे काल वयाच्या 103 वर्षी निधन झाले आज सकाळी 10 वाजता त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत मंडळअधिकारी आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सानप यांनी श्रद्धांजली अर्पण केली यावेळी सर्व क्षेत्रातील लोक उपस्थित होते 


किसनराव नरवाडे पाटील यांनी स्वतंत्र लढ्यात सहभाग नोंदवला होता संयुक्त महाराष्ट्रच्या लढ्यात ते सहभागी होते अत्यंत साधी राहणी, मनमिळाऊ स्वभाव असलेले किसनराव अण्णा म्हणून पंचक्रोशीत परिचित होते गेल्या काही दिवसा पासून ते घरीच आसायाचे काल दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मावळली या वेळी त्यांचे वय 103 वर्ष एवढे होते आज सकाळी त्यांच्या पार्थिव देहावर त्यांच्याच लक्ष्मी नावाच्या शेतात अंत्यविधी करण्यात आला या वेळी तहसीलदार यांच्या वतीने मंडळ अधिकारी पिंपळनेर पोलिसांनी श्रद्धांजली अर्पण केली त्यांच्या पच्यत पत्नी, तीन मुले मुलगी सुना नातंवड असा मोठा परिवार आहे नरवडे यांच्या दुःखात रिपोर्टर परिवार सहभागी आहे 

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....