Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडएसटी कर्मचारी २२ डिसेंबरला काढणार मंत्रालयावर मोर्चा

एसटी कर्मचारी २२ डिसेंबरला काढणार मंत्रालयावर मोर्चा


बीड/मुंबई (रिपोर्टर) एसटी कर्मचार्‍यांचा गेल्या दीड महिन्यापासून संप सुरू आहे. या संपाबाबत अद्यापपर्यंत तोडगा निघालेला नाही. परिवहन मंत्र्यांनी अल्टिमेट देवुनही कर्मचारी कामावर रुजू झाले नसल्याने कर्मचार्‍यांविरोधात कारवाईची सुरुवात झाली असली तरी कर्मचार्‍यांनी आता २२ डिसेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. या मोर्चामध्ये राज्यभरातील कर्मचारी सहभागी होणार असल्याचे एसटी कामगार संघटनेचे शशिकांत राव यांनी सांगितले.

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या दीड महिन्यापासून कर्मचारी संपावर आहेत. कर्मचारी आणि परिवहन मंत्र्यात चर्चा झाल्या असल्या तरी या चर्चा निष्फळ ठरल्या. कर्मचार्‍यांनी कामावर रुजू व्हावे, असा शेवटचा अल्टिमेट परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेला आहे तरीही कर्मचारी कामावर रुजू झाले नसल्याने कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यास सुरुवात झाली तर दुसरीकडे आपली मागणी लावुन धरण्यासाठी कर्मचारी संघटनेने २२ डिसेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चामध्ये राज्यभरातील एसटी महामंडळाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत.

Most Popular

error: Content is protected !!