Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeक्राईमधक्कादायक घटना-वैतागवाडी येथे गर्भवती नवविवाहितेसह पती ची आत्महत्या

धक्कादायक घटना-वैतागवाडी येथे गर्भवती नवविवाहितेसह पती ची आत्महत्या

नातेवाईकांचा आक्रोश

नेकनुर (रिपोर्टर ) नेकनुर ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे धक्कादायक घटना घडली असुन पती पत्नी ने आत्महत्या केल्याने नातेवाईकांनी आक्रोश करत संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे घटनास्थळी नेकनुर पोलीसानी तातडीने जावुन मृतदेह ताब्यात घेऊन नेकनुरच्या स्त्री व कुटीर रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास नेकनुर पोलीस करत आहे.

inbound2709693678521058016

बीड तालुक्यातील व नेकनुर ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे आज धक्कादायक घटना घडली असुन नव विवाहित पती पत्नीने आत्महत्या केली आहे. पोलीसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार वैतागवाडी येथील राजेश जगदाळे वय २७ वर्षे आणि दिपाली डिसले वय २४ वर्षे रा दोघेही वैतागवाडी यांचा विवाह ११ महिन्यापूर्वी वैतागवाडी येथे झाला होता त्यांचा संसार सुरू होता काही महिण्यात घरात अनखी एका नवीन पाहुण्याचे आगमन होणार होते परंतु आज दि १६ डिसेंबर रोजी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास वैतागवाडी येथे राहत्या घरात पती पत्नीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजेश व दिपाली दोघांचे आई वडील शेतात तुर काढण्यासाठी गेले होते. गावात एका ठिकाणी सोळाव्याचा कार्यक्रम होता म्हणून ते घरी आले असता घराचे दार आतून बंद होते. त्यानी आवाज दिला खटके दिले तरी आतून काहीच प्रतिक्रिया येत नसल्याने त्यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता दिपाली जगदाळे याचा मृतदेह बेडवर पडलेला होता तर राजेश जगदाळे हा लोखंडी आळुला गळफास घेतलेल्या अवस्थेत होता या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून शवविच्छेदनाच्या आहवाला नंतरच उघड होईल


या घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव पोलीस कर्मचारी परमेश्वर सानप, प्रशांत क्षीरसागर,हे घटनास्थळी हजर झाले होते घटनेची वार्ता पसरताच गावातील सैकडो लोक घटनास्थळी जमा झाले होते या घटनेने संपूर्ण गावाला धक्का बसला असून असुन सर्वांच्या डोळ्यात आश्रु वाहत होते या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश ऱ्हदय पिळवटून टाकणारा आहे.

Most Popular

error: Content is protected !!