Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमपेट्रोल पंप सुरू होण्यापुर्वीच चोरट्यांचा डिझेलवर डल्ला

पेट्रोल पंप सुरू होण्यापुर्वीच चोरट्यांचा डिझेलवर डल्ला


बीड (रिपोर्टर)- पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या असून ज्या ठिकाणी नवीन पेट्रोल पंपाचे काम सुरू आहे अशा ठिकाणी नेहमीच चोरटे लक्ष ठेवून असतात. माजलगाव शिवारातील माजलगाव-परभणी, रस्त्यावर काम सुरू असलेल्या अन्वयराजे पेट्रोल पंपावरील एक हजार लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी माजलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


वचिष्ठ रोहीदास डाके (रा. पिंप्री ता. माजलगाव) यांनी माजलगाव शिवारातील माजलगाव-परभणी रस्त्यावर अन्वयराजे डाके पेट्रोल पंप टाकला असून त्याचे काम सुरू आहे. त्यांनी डिझेलच्या टाकीमध्ये चेकिंगसाठी डिझेल सोडले असता ते काल रात्री अज्ञात चोरट्याने त्यातील एक हजार लिटर डिझेल चोरून नेले. त्याची किंमत ९४ हजार रुपये आहे. या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीसात डाके यांनी तक्रार दिली आहे.

Most Popular

error: Content is protected !!