Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडकेजउभ्या दुचाकी आणि पिकअपला पाठीमागून धडक दोघे जण गंभीर जखमी; मस्साजोग येथील...

उभ्या दुचाकी आणि पिकअपला पाठीमागून धडक दोघे जण गंभीर जखमी; मस्साजोग येथील घटना


मस्साजोग (रिपोर्टर) केज ते मांजरसुंबा महामार्गावर लगत असलेल्या मस्साजोग येथे चार चाकी वाहनांची उभ्या दुचाकी आणि पिक अपला पाठीमागून भिषण धडक लागून चार चाकी वाहनातील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.


केज ते मांजरसुंबा महामार्गा लगत असलेल्या मस्साजोग येथे मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास क्विड चार चाकी क्र एम एच ४४ एस १२७० या चार चाकी वाहनाने उभ्या दुचाकी आणि पिक अप क्र एम एच २० इ जी १० ४३ या दोन वाहनांना पाठीमागून भिषण धडक लागून क्विड या चार चाकी वाहनातील डॉ शिंदे रा.जानेगाव, डॉ संदिपान सारूक रा.जोला, हे दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Most Popular

error: Content is protected !!