Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडनसता शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर बसतील, बीडच्या शेतकर्‍यांचे दुसर्‍या दिवशीही मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन

नसता शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर बसतील, बीडच्या शेतकर्‍यांचे दुसर्‍या दिवशीही मंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन


औरंगाबाद (रिपोर्टर)ः- भुसंपादनाच्या नविन कायद्यानूसार शेतकर्‍यांना मावेजा दिला जात नसल्याने शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने औरंगाबाद येथील रोहीयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयासमोर काल पासून बीडचे शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनाची वेळीच दखल घेतली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर शेतकरी आंदोलनाला बसतील असा इशारा भाई नवले यांनी दिला आहे.


केंद्र सरकारने २०१३ साली भूसंपादनाचा नवा कायदा केला या नविन कायद्यानूसार शेतकर्‍यांना मावेजाचे वाटप केले जात नाही. बीड जिल्ह्यातील अनेक प्रकरणे प्रलंबीत आहे. प्रलंबीत प्रकरणे निकाली काढले जात नाही. भूसंपादन कार्यालयात अनेक वेळा चकरा मारुनही शेतकर्‍यांना न्याय मिळत नाही. शेतकर्‍यांना नविन कायद्यानूसार मावेजा वाटप करावा या मागणीसाठी कालपासून बीड येथील शेतकरी रोहयो मंत्री संदीपान भूमरे यांच्या औरंगाबाद येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे. या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली नाही तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोरही उपोषण करु असा इशारा शिरुर तालुक्यातील शेतकर्‍यांसह शेतकरी कामगार पक्षाचे भाई राजेंद्र नवले यांनी दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!