Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडलवुळमध्ये उपद्रव घालणार्‍या वानरांना वनविभागाने केले जेरबंद, ग्रामस्थांनी केला आनंदोत्सव साजरा

लवुळमध्ये उपद्रव घालणार्‍या वानरांना वनविभागाने केले जेरबंद, ग्रामस्थांनी केला आनंदोत्सव साजरा

कुत्र्याच्या पिलानंतर लहान मुलांना केले होते टार्गेट
गावामध्ये वानरांची होती दहशत

माजलगाव (रिपोर्टर) माजलगाव तालुक्यातील लवुळ या गावात मागील काही दिवसांपूर्वी तिन मोठ – मोठ्या वनरांनी धुडगुस घातला होता. कुत्र्यांच्या छोट्या पिलांना उचलुन नेत उंचावरून त्यांना खाली जमिनीवर फेकुन देत त्यांना ठार करत. परिणामी गावातील कुत्र्यांच्या पिलांची संख्या कमी झाल्यानंतर वानरांनी लहान मुलांना टार्गेट केले होते. त्यामुळे गावात दहशत पसरली होती. दरम्यान तिन वनविभागाच्या अधिका-यांनी अवघ्या काही तासातच या वानरांना जेरबंद केल्यामुळे गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


तालुक्यातील लवुळ येथे मागील काही दिवसांपासून वानरांनी धुमाकुळ घातला होता. शालेय विद्यार्थ्यांना तसेच गावातील महिला व शेतक-यांना शेतात जाता येता या वानरांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे गावात दहशत निर्माण झाली होती. ग्रामस्थांनी वारंवार वनविभागाला याबाबत कळविलेही होते. शुक्रवारी ता. १७ धारूर येथील वनविभागाच्या अधिका-यांनी भेट देउन नागपुर, औरंगाबाद येथील वनविभागाच्या अधिका-यांना बोलावले होते. आज सकाळीच या उपद्रवी वानरांना पकडण्यासाठी नागपूर येथील पथकाने पिंजरा लावला होता. या जाळीत दोन श्वानांची पिले ठेवल्यानंतर तिनपैकी दोन वानर या जाळ्यात अडकले तर मागील आठ दिवसांपूर्वी एक वानर गाव सोडुन गेल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले. या वानरांना पकडणा-या पथकामध्ये नागपूरचे वनअधिकारी समाधान गिरी, औरंगाबाद वनअधिकारी श्री. पाटील, श्री. चिकटे, धारूरचे वनअधिकारी डी. एस. मोरे या तिन पथकांनी आज शनिवारी ता. १८ सकाळी या उपद्रवी तीनपैकी दोन वानरांना अवघ्या पाउन तासातच पिंज-यात जेरबंद केले असल्याने ग्रामस्थांनी सुटकेश्वास निश्वास टाकला आहे.

Most Popular

error: Content is protected !!