Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडनिराधारांच्या मदतीला आ. संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते धावले

निराधारांच्या मदतीला आ. संदीप क्षीरसागरांचे कार्यकर्ते धावले


देवीबाभुळगाव, चांदेगाव, जेबापिंप्रीत डॉ.जोगदंड
यांनी साधला गावकर्‍यांशी संवाद
बीड (रिपोर्टर) बीड तालुक्यासह मतदारसंघातील अपंग, विधवा, निराधार, वंचितांना आधार देण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी गावागावातील वंचित, उपेक्षितांना योजनांचा लाभ द्या, असे सांगितल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज डॉ. जोगदंड यांनी देवीबाभुळगाव, चांदेगाव, जेबापिंप्री येथे जावुन नागरिकांशी संवाद साधत योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांना संबंधित गरजुंच्या कागदपत्रांची पुर्तता करत त्यांना योजनांचा लाभ कसा मिळेल याकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या.
ग्रामीण भागातील अनेक वृद्ध, अपंग, विधवा, निराधार, वंचितांना शहरात येऊन योजनेचे कागदपत्र देणे अवघड जाते.

अनेकांना कुठल्या कार्यालयामध्ये जायचे आहे हे माहित नसते. त्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही. म्हणून बीड तालुक्यासह मतदारसंघातील अपंग, विधवा, निराधार, वंचित यांना आधार देण्यासाठी आ. संदीप क्षीरसागर यांनी गावागावातील वंचित, उपेक्षितांना मदत करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या होत्या. त्याअनुषंगाने आ. क्षीरसागरांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जोगदंड यांनी गावागावात भेटीगाठी वाढवून बैठका घेत योजनांचा लाभ प्रत्येक वंचितांना आणि उपेक्षितांना देण्याचा विडा उचलला आहे. आज देवीबाभुळगाव, चांदेगाव, जेबापिंप्री या ठिकाणी गावकर्‍यांसोबत संवाद साधत योजनांची माहिती देत कार्यकर्त्यांना योजनेसंदर्भात गरजुंना मदत करून कागदपत्र जमा करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी देवीबाभुळगाव येथे सरपंच सुमंत गुरव, विलास जोगदंड, बबन जोगदंड, उपसरपंच सुरेश जोगदंड, अरुण जोगदंड, नारायण जोगदंड, चेअरमन उमेश जोगदंड, पंडित जोगदंड, रामा शेळके, रविंद्र जोगदंड, विलास जोगदंड, गणेश जोगदंड हे उपस्थित होते तर चांदेगावात पिंटू पोपळे, कल्याण कोल्हे, बप्पा हावळे राजेंद्र कोल्हे, उत्रेश्‍वर खोमणे, गौतम हवाळे, सुनिल कोल्हे, राहुल हावळे आदी उपस्थित होते.
००००

Most Popular

error: Content is protected !!