Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडअप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्याकडून आढावा

अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांच्याकडून आढावा


बीड (रिपोर्टर):- राज्याचे रोजगार हमी व मृद व जलसंधारण अप्पर मुख्य सचिव नंदकुमार हे आज बीड जिल्ह्यात आले असून त्यांनी रोजगार हमीच्या कामासोबत ‘हर खेत में पाणी’ या योजनेचा प्रामुख्याने आढावा घेतला.


रोजगार हमी योजने अंतर्गत जलसंधारणची कामे मोठ्या प्रमाणात राबवून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली कशी आणता येईल? अशीच योजना राज्य सरकारने अंमलात आणली आहे. त्यासोबत पालकमंत्री रस्ते विकास योजना व मृद व जलसंधारण विभागांतर्गत शेतात बांधबंधिस्त आणि चारीचे काम करून शेताला पाणी मिळेल अशी व्यवस्था करावी. ही योजना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोजगार हमी योजना आणि जलसंधारण विभागामार्फत राबवली जाते. आज सकाळी अप्पर मुख्य सचिव नंदकुमार यांनी नियोजन भवनाच्या सभागृहामध्ये संबंधित अधिकार्‍याकडून या योजने बाबतच्या अडचणी झालेले कामे आणि भविष्यात योजना गतिमान करण्यासाठी काय करता येईल? यासर्व बाबींचा आढावा घेतला. सुरूवातीला या बैठकीचे प्रस्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी केले. बैठकीला जिल्हाधिकारी राधाकिसन शर्मा, सर्व तहसीलदार, सर्व विभागाचे उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी आणि रोजगार हमी योजनेचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!