Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडडॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची व सुशोभीकरणास निधी कमी पडू देणार नाही

डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची व सुशोभीकरणास निधी कमी पडू देणार नाही


आ.संदिप क्षीरसागरांची ग्वाही; सर्वांना
विश्‍वासात घेवून शिष्टमंडळाने मागणी द्यावी
बीड (रिपोर्टर):- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंचीचे व परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी शिष्ट मंडळाने केली होती. याठिकाणी साचणारे पाणी व इतर समस्याबाबत आ.संदिप क्षीरसागर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसराची पाहणी केली. यावेळी शिष्ट मंडळाने समाज घटकातील सर्वांना तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती प्रेम करणार्‍या मंडळींना विश्‍वासात घेवून उंची वाढवण्याच्या व सुशोभीकरणाच्या कामाबाबत त्यांचे मत व सूचना घ्याव्यात. या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली आहे.


शनिवार दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आ.संदिप क्षीरसागर यांनी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड.डी.बी.बागल, वैजीनाथ तांदळे, बबन गवते, सम्राट चव्हाण, अशोक वाघमारे यांच्यासह शिष्ट मंडळासमवेत घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बीड शहरातील पुतळ्याची पाहणी केली. याठिकाणी रस्त्याचे काम होत असतांना साचणारे पाणी व इतर अडीअडचणी बाबत शिष्टमंडळांनी सूचना करत परिसराचे सुशोभीकरण व भीमसृष्टी दुरूस्ती संदर्भात काही मागण्या अशोक वाघमारे यांच्या समवेत शिष्ट मंडळाने केल्या होत्या. या मागण्यांची आ.संदिप क्षीरसागर यांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला तशा सूचनाही दिल्या आहेत. परंतू डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंचीचे व सुशोभीकरणाचे कामाबाबत समाज घटकातील सर्वांना विश्‍वासात घेवून त्यांचे विचार, त्यांच्या सूचना घेवून एकत्रित मागणी द्यावी. या कामास पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून तात्काळ निधी उपलब्ध करून देवू. त्याचबरोबर शासनाच्या इतर योजनांच्या माध्यमातूनही या कामास निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली. यावेळी शिष्ट मंडळामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस अशोक वाघमारे, सत्यनारायण ढाका, बाळासाहेब जोगदंड, विनोद जोगदंड, दादा हातागळे, भारत कांबळे, विनायक सवई, अशोक जाधव, विजय चांदणे, गोपी जोगदंड, पंकज चांदणे, विशाल वाघमारे, दादा कांबळे, चंद्रकांत जोगदंड, सचिन जोगदंड, अनिल जोगदंड, लखन वीर, शंतनु विद्यागर, संदेश गायकवाड, आकाश मोरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!