Thursday, January 20, 2022
No menu items!
Homeक्राईमआष्टीत वेश्या व्यवसाय करणार्‍या लॉजवर छापा

आष्टीत वेश्या व्यवसाय करणार्‍या लॉजवर छापा


बीडचे पथक आष्टीत येऊन कारवाई करतय मग आष्टी पोलिस काय करतात ? शहरात अनेक अवैध धंदे जोमात
आष्टी (रिपोर्टर) आष्टी शहराजवळील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून बीडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी छापा टाकला. यात 1 तरुणींसह 1 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी लॉजचालक लहु सानप,दिपाली राम पिटाळे अहमदनगर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.आष्टी शहरात अनेक अवैध धंद्याचा सुळसुळाट असून बीडचे पथक येऊन कारवाई करतेत मग आष्टी पोलिसांच्या कामगिरी वर काय करतात प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.


नगर जामखेड महामार्गावर आष्टी तालुक्याच्या तहसिल कार्यालयासमोर असणार्‍या राधिका नावाचे लॉजिंग आहे. तेथे संगनमताने वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी आपल्या सहकार्यांना सोबत घेत शनिवारी सायंकाळी 7 च्या सुमारास डमी ग्राहक पाठवून खात्री केली असता तेथे लहु सानप हा बाहेरून महिला आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत होता.स्थानिक गुन्हे शाखेने खात्री साठी डमी ग्राहक पाठवून खात्री केली असता तेथे अहमदनगर येथील दिपाली राम पिटाळे महिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी आली होती.कुंटणखाना चालवणारा मालक लहु सानप कासेवाडी ता. आष्टी यांच्यावर कलम 3,4,5,7 ( 2) क नुसार आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई प्रमुख पोनि सतीश वाघ स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोह शेख,पो ना पी बी कदम,पोना दुबाले,मपोना जे के नरवाडे,पो शी शेख,यांनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!