Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडपैसा, गुंडागर्दीची भाषा ऐकायला मिळतेय, ही पवित्र लोकशाही आहे, वडवणीच्या जाहीर सभेत...

पैसा, गुंडागर्दीची भाषा ऐकायला मिळतेय, ही पवित्र लोकशाही आहे, वडवणीच्या जाहीर सभेत ना.धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना खणखणीत सवाल


भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांनीच सांगावं इथल्या नेत्याकडे एवढं आलं कुठून
वडवणी (रिपोर्टर) हि निवडणुक लोकशाही पध्दतीने व्हायला पाहिजे. इथंगुंडागर्दी,हुकूमशाही, दडपशाहीची भाषा ऐकायल मिळत आहे, ही लोकशाही आहे.जनतेला मतदानाचा पवित्र अधिकार असून आता भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांनीच इंथ येऊन सागांव कि इंथल्या नेत्याकडे एवढ आलं कुंठून असा खणखणीत सवाल ना.धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांंच नाव न घेता उपस्थितीत केला आहे.


वडवणी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सह पुरस्कृत शहर विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शहरातील बाजार तळावर काल सायं 8 वा.राज्याचे समाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर आ.प्रकाश सोंळके, माजी आ.केशवराव आंधळे,सभापती जयसिंह सोंळके,बाबुराव पोटभरे, प्रा.मिंलिद आवाड,अशोक डक,बाबुशेठ नहार,दिनकरराव आंधळे, दिनेश मस्के,भारत जगताप, अमोल आंधळे, बजरंग साबळे,बन्शी मुंडे, सह आदि मान्यवर उपस्थितीत होते. या दरम्यान पुढे बोलाताना ना.धनंजय मुंडे म्हणाले कि, हि निवडणुक लोकशाही पध्दतीने होत आहे आणि यामध्ये मतदारांना मतदान करण्याचा पवित्र आधिकार आहे.यामध्ये भाजपा पक्षाच्या लोकांकडून गुंडागर्दी,हुकूमशाही, दडपशाही आणि पैसाची भाषा वापरत असतील तर ती अजिबात येथं शिकवू नका, तर उद्या (आज) भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या येत आहेत.त्यांनीच सागांव इंथल्या भाजपाकडे एवढं कुंठून आलं यांचा हिशोब विचारावा असा सवाल
नाव न घेता पंकजा मुंडेंना ना.धनंजय मुंडेनी भर सभेत खणखणीत विचारत राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात न.प. द्या,वार्डा वार्डातील नगरसेवकांनी दिलेला शब्द नक्कीच पुर्ण करु,मला वडवणी शहरातून आठवड्याला दोनदा जायचे आहे.आ.प्रकाशदादा रोजच इथून प्रवास करायचा आहे.परत आम्हाल जनतेमध्ये येऊन मत मागायची आहे.याठिकाणी नगरध्यक्ष बसताच अवघ्या पंधरा दिवसात 100 कोटी रु.विकास कामाचा शुंभारंभ मी आणि दादा येऊन करतोत अशी ग्वाही देत,अब दो दादा एक साथ है…तो डरने का नही असं म्हणत माजी आ.केशव आंधळे याच्या देखीला भाषणाची स्तुती केली आहे.तर या सभेत अनेक मान्यवरांची भाषणे झाली असून प्रास्ताविक भारत जगताप तर सुत्रसंचलन संतोष डावकर व आभार अमोल आंधळे यांनी व्यक्त केले यावेळी जाहिर सभेल हजारोंच्या संख्येने वडवणीकर उपस्थित होते.


आता बघतोच, तयारी ठेवा – आ.प्रकाश सोंळके
मागच्या पाच वर्षात वडवणी शहराचे वाटोळं करणार्‍या बाप लेकाला यावेळी वडवणी शहरवासीया उलथून टाकतील हे आज जमलेल्या जनसमुदायातून दिसून आले आहे अशी प्रतिक्रिया देत म्हणाले की, माझी ईडी लावण्याची भाषा करणार्‍यांना इतकंच सांगणे आहे. तुमच्या भ्रष्टाचाराचा संपूर्ण लेखाजोखा आहे. तुमच्यावर आधीच चौकशी सुरू आहे. जेल मध्ये एकदा जाऊन आला आहात पण पुन्हा एकदा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी जेल मध्ये जाण्याची तयारी ठेवा असा इशारा देखील आ.प्रकाश सोळंके यांनी यावेळी दिला. डोळ्यासमोर व्हिजन ठेऊन ह्या निवडणुकीला प्राध्यान दिले आहे, माजलगाव शहराचा ज्या प्रकारे सर्वागीण विकास झाला त्याच धर्तीवर वडवणी शहराचा कायापालट करण्यात येईल असा शब्द देखील आ प्रकाश सोळंके यांनी दिला.

दादा, तुमच्यावरचा अन्याय आम्हाला दिसला
केशवदादा तुमच्यावर पक्षाने अन्याय केला तो आम्हाला दिसत होता.परंतु तो तुम्हाला कसा दिसला नाही.तुमच आज भाषण ऐकायला मिळालं यामधून राग बाहेर आला.तसा राग आता शहरातील जनतेमधून बाहेर यावा,हि आघाडी करण्यामध्ये त्यांच्या पोरांचा वाटा आहे.असं म्हणत अन्याया दादाला दिसला नाही तो आम्हाला दिसला असं ना.मुंडे यांनी माजी आ.केशवराव आंधळे यांना उघडपणे बोलून दाखविला.

Most Popular

error: Content is protected !!