पत्रात अजित पवारांचंही नाव!
महाराष्ट्रात एकीकडे राजकीय उलथापालथ होत असताना दुसरीकडे मुंबईच्या महापौरी किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका पत्राद्वारे पेडणेकरांना ही धमकी आली असून या पत्रावर संबंधित व्यक्तीचं नाव, पत्ता देखील नमूद करण्यात आला आहे. या पत्राची आपण गांभीर्याने दखल घेतली असून त्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणार असल्याची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींसोबतच आता या धमकी पत्राची देखील चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे.