Sunday, January 23, 2022
No menu items!
Homeबीडआष्टीदेवस्थानच्या जमिनी बळकवणार्‍यांना जेलमध्ये टाकणार - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

देवस्थानच्या जमिनी बळकवणार्‍यांना जेलमध्ये टाकणार – अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

आष्टी रिपोर्टर

268003582 1374119413022828 9064280240841664656 n

भाजप सरकार भिती निर्माण करण्याचे काम करत असून महाराष्ट्रात अनेक फर्जी वाडे आहेत. आष्टी त ही फर्जी वाडा आहे. विठोबा देवस्थान, मस्जिद, राम देवस्थानच्या जमिनी बळकावल्या आहेत. मतदानात ही फर्जी वाडा केला आहे.हा फर्जी वाडा उघड करून जमिनी बळकावणा-यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही आष्टी शहरातील नागरीकांनी दहशतीखाली न राहता दहशत मुक्त करण्यासाठी आमची फौज तैनात आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा विकास करण्यासाठी आमचे सरकार आहे. निधी कमी पडू देणार नाहीत. असे मत महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभेत बोलताना केले. नमस्ते टर्म च्या नादात कोरोना काळात अनेक मृत्युमुखी पडले त्यांची जबाबदारी मोदी सरकारची आहे.महाराष्ट्रत 1 ही रुग्ण औषधे वाचून मृत्युमुखी पडले नाही,भाजप सरकार करु शकले नाही ते 1 महिन्यात महाविकास आघाडी सरकारने केले शेतक-यांचे 2 लाख पर्यंत कर्ज माफ केले.सरकारने शेतक-यांनी संकटात हात दिला, भिती निर्माण करायचे राजकारण भाजप सरकार करतय फर्जी वाडा आष्टीत आहे.उघड करुन सर्वांना तुरंगात टाकणार,मस्जिद,विठोबा देवस्थान राम देवस्थान च्या जमिनी सोडल्या नाहीत दौड मध्ये ही जमीन सोडली नाही आमच्या घरी पाहुणे येणार आहेत देवेंद्र म्हणातात मलिक साहेबांच्या घरी छापा टाका आमचे सरकार स्वच्छ आहे.चोरो की बारात भारतीय जनता पार्टी सरकार आहे.भाजप सरकारने ओबीसी आरक्षण मिळण्यास अडथळा निर्माण करत आहे.त्यांना भाजपचे पाठबळ आरक्षण मुक्त भारत करण्याचे काम भाजप करत आहे. हा भाजपचा अजेंडा आहे.आपण सावध राहिले पाहिजे महाविकास आघाडी सरकार विकासासाठी पैसे कमी पडू देणार नाही आजबे तुम्ही प्रस्ताव आणा मी पैसे देतो जनतेने सर्व उमेदवार विजयी करावेत अन्याय अत्याचाराला खाडे खाबरायचे नाही आम्ही तुमच्या सोबत आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. बाळासाहेब आजबे यांनी केले.

Most Popular

error: Content is protected !!