Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडअंगावर पेट्रोल ओतून घेताच बँकेने कर्ज मंजुरीचे पत्र दिले

अंगावर पेट्रोल ओतून घेताच बँकेने कर्ज मंजुरीचे पत्र दिले

बीड रिपोर्टर

ppp 2

व्यवसायासाठी एसबीआय बँक कर्ज देत नसल्याने वैतागलेल्या एका व्यक्तीने आज दुपारी बँकेसमोर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी सदरील व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान या वेळी पोलिसांनी बँक कर्मचार्‍यांशी चर्चा घडवून आणली. यात बँकेने तात्काळ कर्ज प्रकरणाला मंजूर दिली. खापर पांगरी येथील शेख रसूल खाजामियॉ यांनी एसबीआय बँकेकडे व्यवसाय करण्यासाठी कर्ज प्रकरण दाखल केले होते. तीन वर्षापासून ते बँकेत खेटे घालत आहेत. बँक त्यांना कर्ज देत नसल्याने वैतागून त्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. आज दुपारी शेख रसूल यांनी बँकेसमोर स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान शेख रसूल यांनी स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने बँक परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यांना सोबत घेऊन बँकेच्या कर्मचार्‍यांसोबत चर्चा घडवून आणली. यामध्ये काय तोडगा निघाला हे मात्र समजू शकले नाही.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!