Friday, January 28, 2022
No menu items!
Homeबीडदारासमोर उभ्या सख्ख्या बहिणींना स्कॉर्पिओने चिरडले

दारासमोर उभ्या सख्ख्या बहिणींना स्कॉर्पिओने चिरडले

बीड रिपोर्टर

268426820 429475475384090 6005058477248660958 n
268550736 352659410002009 7689782200059116500 n
268397063 444508593731561 3770339250204865717 n

जेवण करून दारासमोर उभ्या असलेल्या दोन सख्ख्या बहिणींना भरधाव वेगात येणार्‍या स्कॉर्पिओने जोराची धडक दिली. या अपघातात दोन्ही बहिणी गंभीररित्या जखमी होऊन ठार झाल्या. ही दुर्दैवी घटना रात्री पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे घडली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रोहिणी महारुद्र गाडेकर (वय 26), मोहिणी महारुद्र गाडेकर (वय 22) या दोघी बहिणी आपल्या धनगर जवळका या गावी आल्या होत्या. रोहिणी ही नर्सिंगला तर मोहिनी एका खासगी कंपनीत काम करीत होती. या दोघी बहिणी रात्री जेवण केल्यानंतर दारा समोर उभ्या राहिल्या. भरधाव वेगात आलेली स्कॉर्पिओ क्र. एम.एच. 12 एम.आर. 9113 च्या चालकाने गाडी निष्काळजीपणे चालवून दोघींना जोराची धडक दिली. यात दोघी गंभीररित्या जखमी होऊन ठार झाल्या. या दुर्दैवी घटनेने धनगर जवळका येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. स्कॉर्पिओ चालकाने पुढे जावून अन्य एकास धडक दिली. त्यानंतर तो फरार झाला. पाटोदा पोलिसांनी सदरील स्कॉर्पिओ ताब्यात घेतली आहे. दोघी बहिणींच्या मृतदेहाचे बीड जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Most Popular

error: Content is protected !!