दहा दिवसातच तरुणाला मिळाली नविन शिधापत्रिका
वडवणी (रिपोर्टर):- सन 2019 पासून नविन शिधापत्रिका मिळावी म्हणून 30 वर्षीय तरुण वडवणी तहसिलच्या पुरवठा विभागात हेलपाटे मारत होता परंतू आधिकारी व कर्मचारी तरुणाच्या विनंती मान देत नसल्याच उघड झाले याबाबत रिपोर्टरने 25 जून 2022 रोजी साजं.दै.रिपोर्टरमध्ये द् रिअर बातमी करुन प्रकाशित केली आणि अवघ्या दहा दिवसांतच नविन शिधापत्रिका देवून टाकली आहे.
वडवणी तालुक्यातील मौजे चिंचाळा येथील रहिवाशी आणि सुशिक्षित बेकार असणारे धम्मपाल सोपान डावरे यांनी 10 आक्टोबर 2019 रोजी वडवणी तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात शासनाच्या सर्व कागदपत्राची पूर्ताता करत नविन शिधापत्रिका मिळावी म्हणून अर्ज केला होता.परंतू येथील आधिकारी आणि कर्मचारी मनमानी कारभार करत उडावाउडवीचे उत्तर देत वेळ भागवून घेत होते.यात धम्मपाल डावरे यांनी साजं.दै.रिपोर्टरचे वडवणी तालुका पत्रकार भैय्यासाहेब तांगडे यांची भेट घेऊन तीन वर्षापासून झालेल्या घडामोड सांगितली आणि याबाबत दै.रिपोर्टरने देखील सखोल तपासणी करत दि.25 जून 2022 च्या अंकात उघडा डोळे वाचा निट पुरवठा विभागाची अकामगिरी,तरुणाला मिळेना तीन वर्षापासून नविन शिधापत्रिका या माथाळ्याखाली प्रकाशित करण्यात पुरवठा विभागाच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले करत इतर प्रश्न घेत बातमी ठळक शब्दात प्रसिध्द करण्यात आली होती.या बातमीची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले आणि तीन वर्षापुर्वी दाखल केलेले अर्ज सापडून सदरील तरुण धम्मपाल डावरे यांचा अर्ज निकाली काढत काल दि.6 जुलै 2022 वार- बुधवार रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पुरवठा विभागातील पेशकर असणारे दिवटे यांनी डावरे यांना बोलावून नविन शिधापत्रिका देऊन टाकली आहे.तर तीन वर्षापासूनचे हेलपाटे मारुन आणि शासनाच्या सर्व पूर्ताता करत कागदपत्रे जोडून देखील शिधापत्रिका मिळत नसल्याने हा अकामगिरीची साजं.दै.रिपोर्टरने बातमी छापली आणि अवघ्या दहा दिवसातच नविन शिधापत्रिका मिळाली असल्याने धम्मपाल डावरे यांनी साजं दै.रिपोर्टरचे आणि पुरवठा विभगाचे देखील आभार मानले आहे.