बीड (रिपोर्टर)ः- सर्वसामान्य नागरीकांच्या जान आणि मालची जबाबदारी स्विकारत पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी गुन्हेगारांविरोधात आक्रमक भूमीका घेतली. अंबाजोागाईत 40 वर्षीय महिलेच्या गळ्यातले 21 ग्रॅमचे गंठन मोटारसायकलवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसकावून पळवून नेलं होत. त्या प्रकरणाचा छडा लावत असतांना गोव्यासह महाराष्ट्रभरातील जिल्ह्यात उच्छाद मांडणार्या टोळीचा पर्दाफाश झाला. तब्बल 7 दिवसाचा पाठलाग तिन हजार किलोमिटरच्या प्रवासानंतर या टोळीतील मोरक्यासह चौघांजणांना जेरबंद करुन या गुन्हेगारांविरोधात मोक्का लावत पोलीस अधिक्षकांनी गुन्हेगारांना माफी नसल्याचा संदेश दिला. ही कारवाई करण्यासाठी पोलीसांना प्रचंड महेनत घ्यावी लागली. गुन्हेगारांना पकडण्यासाठी तिन हजार किलो मिटरचा पाठलाग करावा लागला. बीड पोलीसांनी महाराष्ट्रासह परराज्यात धुमाकूळ घालणार्या सोनं साखळी चोरांच्या टोळीच्या मुसक्या बांधुन त्यांच्यावर मोक्का लावला.
20 जानेवारी 2022 रोजी गोदावरी दिनकर तिडके रा.महसूल कॉलनी अंबाजोगाई या 40 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 21 ग्रॅमचे गंठन भरदुपारी हिसकावून दोघांनी दुचाकीवरुन पोबारा केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी महिलेने अंबाजोगाई शहर पोलीसात तक्रार दिली होती. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोडके व पोलीस निरीक्षक बि.एन.पवार यांनी केला. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक पवार यांनी बारकाईने करुन गोपीनीय पध्दतीने आरोपी निष्पन्न करुन अब्बास असलम सइदी (वय-31 वर्षे रा.शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भोजे लोहगांव ता.जि.पुणे) या टोळी प्रमुखासह शरीफ शाह समशेर शाह (वय-26 वर्षे रा.मनमाड नाशीक) रफीक कासमभाई मदारी (वय-35 वर्षे रा.पिरखेडा ता.चाळीसगांव जि.जळगांव), राजेश रामविलास सोनार (वय-36 वर्षे, रा.उल्हासनगर कल्याण जि.ठाणे) या चौघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हया संबंधात तपास करुन त्यांनी चोरलेले 21 ग्रॅम सोन्याचे मिनी गंठन व गुन्हयात वापरलेली दुचाकी जप्त केली. सदर गुन्हा पाच आरोपींने केला असल्याचे उघड झाले. या टोळीने आतापर्यंत महाराष्ट्रात व इतर राज्यात असे 50 पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यात दरोडा, जबरी चोरी,वाटमारी, फसवणुक, पोलीस असल्याचा भासुन फसविणे यासह गंभीर गुन्हे केले आहे. त्यापैकी या प्रस्तावात 12 गुन्हे विचारात घेण्यात आले. त्यातील सात गुन्ह्याची दखल न्यायालयाने घेतली असून पाच गुन्हे पोलीस तपासावर आहे. सदर टोळीने अंबाजोगाईचा गुन्हा करण्यापूर्वी बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत व बीड हद्दीत एकुण चार गुन्हे केलेले आहे. त्यापैकी दोन दरोडे व दोन जबरी चोरीचे गुन्हे आहेत. सदर टोळीने महाराष्ट्रासह गोवा राज्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याची कबुली दिली.सदर टोळीला पकडण्यासाठी पोलीसांना जवळपास 7 दिवसात तिन हजार किलोमिटरचा पाठलाग करावा लागला. मोठे कौशल्य पणाला लावून या टोळीला पकडून पोलीसांनी जिल्ह्यातले पाच गुन्हे उघड आणले. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सुनील लांजेवार, कवीता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जायभाये, अंबाजोगाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवार, तसेच अभिमन्यु अवताडे, पो.ना.वरकड, काकड यांनी केली.
महाराष्ट्रात बीड पोलीसांचे कौतूक
महाराष्ट्रासह परराज्यात धुमाकूळ घालणार्या या टोळीच्या मार्गावर महाराष्ट्र पोलीसांसह गोव्याचे पोलीस होते. मात्र अंबाजोगाई हद्दीत या टोळीने एक गुन्हा केल्याने बीड पोलीसही त्यांच्या मार्गावर लागले. जे महाराष्ट्र आणि गोव्याच्या पोलीसांना जमले नाही ते बीडच्या पोलीसांनी करुन दाखवले.पोलीसांनी जंग जंग पछाडून या टोळीच्या मुसक्या बांधल्या. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या सुचनेवरुन अंबाजोागाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बि.एन.पवार यांनी या प्रकरणात मोक्का कायदाअंतर्गत प्रस्ताव तयार करुन तिन जुलै रोजी पोलीस अधिक्षकांकडे पाठवला. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी या प्रस्तावाचे अवलोकन करुन 4 जुलै रोजी हा प्रस्ताव आपल्या शिफारशीसह विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद कडे पाठवला. 5 जुलै रोजी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी मंजुरी दिली.