प्रशासनाने केले शांततेचे आवाहन
शिरूर कासार (रिपोर्टर): काल रायमोहा येथील युवकाने भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या बद्दल व वंजारा समजबद्दल आक्षेपाहर्त पोस्ट सोशल मीडियावर टाकल्या प्रकरणी येथील पोलीस स्टेशनला निवेदन देऊन त्या व्यक्तीला अटक करावी या मागणीसाठी आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
काल प्रशासनाला निवेदन देऊन कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी शनिवार रोजी शिरुर कासार बंदची हाक दिली होती. आज सकाळपासूनच स्वयं स्फूर्तीने व्यापार्यांनी आपआपली दुकानें बंद ठेऊन बंद मध्ये सहभाग घेतला होता प्रसासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त लावून लोकांना शांततेचे आवाहन साहायक पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट यांनी केले. आज सकल जइउ समाज व सकल वंजारी समाजाच्या वतीने जिजामाता चौक ते छत्रपती संभाजी महाराज चौक ते पुन्हा आबादेव महाराज चौकातून कोळवाडी चौक मार्गे रॅली काढून निषेध नोंदवला. यावेळी जेष्ठ नेते दशरथ वनवे, माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश खेडकर,दहिवंडीचे सरपंच कालिदास आघाव, माजी सरपंच शिलताई आघाव, एम. एन. बडे यांच्यासह तालुक्यातील हजारो समाज रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला.