** **
वडवणी (रिपोर्टर):- वडवणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त सभापती पदाची उद्या निवड होणार आहे. दोन ते तीन नावे आघाडीवर असून आज बैठकावर बैठका होत असून कोणाची वर्णी लावयाची याबाबतचा निर्णय ऐनवेळेवर घेतला जाईल अशी शक्यता आसताना सभापती पदी कोणाला विराजमान करायचे हे आ. प्रकाश सोळंके व त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके हेच ठरवणार आहेत.
याबाबत आधिक माहिती अशी कि, राज्यातील सर्वात लहान वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती गणली जाते. परंतु हिच सहकारी संस्था ताब्यात घेण्यासाठी गेल्या वर्षी आ. प्रकाश सोळंके आणि युवा नेते जयसिंह सोळंके यांनी पणाला लावत ताब्यात घेतली होती. गतवेळी सभापती पदावर दिनेश बन्शीधरराव मस्के यांची निवड करण्यात आली होती. परंतु एप्रिलच्या 28 तारखेला त्यांचे अल्पशा आजाराने दु;खत निधन झाले असल्याने 14 जून 2024 रोजी सभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहिर झाला आणि उद्या या पदाची निवड होत आहे. हि निवड बाजार समितीच्या सभागृहात होत आहे. सदरील पद मिळावे म्हणून दोन ते तीन जणांनी पणाला लावली आहे. परंतु राजकिय समिकरणात कोण जवळचा, कोण फायद्याचा, पदाच्या योग्यतेचा कोण, भविष्यातील राजकारणाचा फायदा या सर्व बाबीचा विचार होणार असून आ. काका आणि पुतण्यामधील समतोल कोण राखू शकतो यांचा देखील विचार करुनच आ. प्रकाश सोळंके आणि युवा नेते जयसिंह सोळंके या पदाचा निर्णय घेणार आहेत. आज सकाळी संचालक मंडळ जयसिंह सोळंके यांच्या बीड येथील बंगल्यावर बोलविले आहेत. येथे विचारमय करुन आजच सायं. 4 वा. तेलगांव येथील स्व. सुंदरराव सोळंके सह.साखर कारखाना येथे आ. सोळंकेसह जयसिंह सोळंके आणि बाजार समितीचे सर्व संचालकाची बैठक घेऊन सभापती पद कोणाला यावर चर्चा करुनच सोळंके काका पुतणे निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.