बीड (रिपोर्टर): कृषी दिनादिवशी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकर्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने करत 2020 व 2023 या दोन्ही वर्षाचा पीकविमा एआयसी कंपनीने रखडवला आहे. तो तात्काळ देण्यात यावा आणि गतवर्षी मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने उद्ध्वस्त झाला आहे, त्या शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी शेतकर्यांकडून निदर्शने करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व धनंजय गुंदेकर यांनी केले.
1 जुलै आपण सर्वत्र कृषीदिन म्हणून साजरा करतो. मात्र या दिवशीच बीड जिल्ह्यातील शेतकर्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली. गेल्यावर्षी मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला. त्यामुळे शेतीत म्हणावे तसे उत्पन्न झाले नाही. जे उत्पन्न झाले त्याला भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. त्या मराठवाड्यातील शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी आणि 2020 व 2023 या दोन्ही वर्षाचा पीकविमा एआयसी कंपनीने रखडवला आहे तो त्यांना तात्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी शेकडो शेतकर्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली.