बीड (रिपोर्टर): राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेसाठी जे जे कागदपत्र लागतात ते काढण्यासाठी सेतु कार्यालयामध्ये सकाळपासूनच गर्दी असल्याचे दिसून येते. राज्य सरकारने काल या योजनेअंतर्गत काही नियमांमध्ये बदलसुद्धा केला. पुर्वी 60 वर्षे वयापर्यंत अर्ज दाखल करता येत होते, आता त्यात 5 वर्षांनी वाढ करून 65 वर्षे वयोगटातील महिलांना अर्ज दाखल करता येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेसाठी जे कागदपत्र लागतात ते काढण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून सेतु कार्यालयात महिलांची तोबा गर्दी असल्याचे दिसून येत आहे. योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. काल अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काही नियमात बदल केले. आता 21 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करता येणार. पूर्वी 15 जुलै शेवटची तारीख होती. आता 65 वर्षे वयापर्यंतच्या महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.