359 संस्थांना 123 कोटींचे बँकेने केलेले आहे कर्जवाटप
बीड, (रिपोर्टर)ः-जिल्हा मध्यवर्ती बँकेने कोट्यावधी रूपयांचे कर्ज संस्थांना वाटप केलेले आहे. संस्थांनी आणि इतर खाजगी लोकांनी कर्जाची परतफेड केली नसल्याने बँकेने आता एक रकमी कर्ज परतफेड योजना सुरू केली असुन त्याच्या वसुलीसाठी थेट कर्जदारांच्या दारासमोर ठिय्या मांडायला सुरूवात केली. बीड शहरातील जुना धानोरा रोड येथील एका कर्ज दाराच्या घरासमोर बँकेच्या अधिकार्याने आज ठिय्या मांडला होता. विशेष करून डपडं वाजवून वसुली मोहिमेला बँकेने सुरूवात केली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने 359 संस्थांना 123 कोटी रूपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. यातील कोट्यावधी रूपयांच कर्ज थकीत आहे. कर्जाची वसुली करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या कर्मचार्यांनी एक रकमी कर्ज परतफेड योजना सुरू केली. ज्यांच्याकडे कर्ज आहे. त्यांना नोटीस पाठविण्यात येत आहे. जे लोक कर्ज भरण्यास सक्षम आहे. अशा लोकांच्या दारासमोर जावून त्या ठिकाणी ठिय्या मांडला जावू लागला. बीड शहरातील सौ.बोंदर सुरेखा प्रभाकर यांच्याकडे 4 लाख 80 हजार 787 रूपयांची थकबाकी आहे. या थकबाकीसाठी बँकेच्या अधिकारी कर्मचार्यांनी त्यांच्या दारासमोर ठिय्या मांडला होता. दरम्यान, जिल्हा बँकेच्या कर्मचार्यांनी यापूर्वी केज व इतर ठिकाणी राजकीय पुढार्यांच्या दारासमोर जावून वसुलीसाठी ठिय्या मांडला होता. या राजकीय पुढार्यांनी त्यांना पैसे भरण्याचे आश्वासन दिचलेले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद ठोंबरे, रवि उबाळे, केशव आगाव, बी.बी कुलकर्णी, संजय राठोड, प्रताप माने, राम मॅडम सह आदींची उपस्थिती होती.