बीड (रिपोर्टर) दगडी शहाजानपूर आणि सौंदाण्यात मोठ्या प्रमाणात हातभट्टी तयार करून त्याची विक्री होत होती. याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही ठिकाणी धाडी टाकून जवळपास पन्नास हजाराची हातभट्टी आणि दारू बनवण्याचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई आज सकाळी पोलिस निरीक्षक संतोष साबळे, एपीआय योगेश उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पवनकुमार राजपूत, सुनिल अलगट यांच्यासह आदिंनी केली.
बीड तालुक्यातील दगडी शहाजानपूर येथे कांता संतोष गायकवाड हे शहाजानपूर शिवारातील तलावाच्या बाजूस वस्तीवर बेकायदा दारू हातभट्टी तयार करून त्याची विक्री करत होते. याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी धाड टाकून तेथील अवैध दारू उध्वस्त केली. गावठी हातभट्टी तयार करत असताना पोलिसांना पाहताच कांता संतोष गायकवाड याने धुम ठोकली. पोलिसांनी त्याठिकाणचा सर्व साठा नष्ट केला. तर दुसरी कारवाई विष्णू गणपत गायकवाड रा.दगडी शहाजानपूर हे दगडी शहाजानपूर शिवारातील तलावाच्या बाजूला अवैध हातभट्टी दारू तयार करत असताना मिळून आले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेथील अवैध दारू पोलिसांनी नष्ट केली. तेथील लोखंडी बॅरल दगडाने ठेचून साहित्य तोडून टाकण्यात आले. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आज सकाळी करण्यात आली.
बीड ग्रामीण पोलिसांची कारवाई