मुंबई, (रिपोर्टर)ः- राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रूग्णालयात करण्यात आली आहे. त्यांना अनेक दिवसांपासुन पित्त व पोट दुखीचा त्रास होता. मात्र सतत दौरे, सभा,कामकाज यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होत होते. पोटाचा त्रास अधिक वाढल्याने त्यांना शस्त्रक्रिया करावी लागली. काल रात्री उशीरा ना.मुंडेंेच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रूग्णालयात आले. ना.मुंडे सोबत चर्चा करत प्रकृतीची काळजी घेण्याबाबत सल्ला दिला.
गेल्या सहा दिवसापुर्वी राज्याचे कृषीमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया सर एच.एन.रिलायन्स फाउंडेशन रूग्णालयामध्ये करण्यात आली. राजकीय परिघामध्ये सातत्याने दौरे, प्रवास होतात. त्यामुळे खान-पानचीही अवेळ होते. मध्यंतरी पित्ताचा त्रास अधिक वाढला, पोट अधिक दुखू लागल्यामुळे ना.मुंडे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या पाच दिवसाच्या कालखंडात ना.मुंडेंच्या प्रकृतीची आस्थेवाइक चौकशी करण्यासाठी अनेकजण रूग्णालयात डेरे दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भ्रमणध्वनीवरून प्रकृतीची चौकशी केली तर भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रूग्णालयात येवून ना.मुंडेची भेट घेतली तर रात्री उशीरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रूग्णालयात दाखल झाले. दोघांमध्ये अर्धा ते एक तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुंडेंना प्रकृतीची काळजी घेण्याबाबत सल्ला दिला.