बीड (रिपोर्टर): नगर रोड ते धानोरा रोड या दरम्यानचा रस्ता खराब असल्याने येणार्या-जाणार्या वाहनधारकांसह नागरीक व शाळकरी मुलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यासाठी आज चक्क शाळकरी मुलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्ता तात्काळ करण्यात यावा, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला.
गेल्या अनेक वर्षांपासून नगर रोड ते धानोरा रोड हा रस्ता खराब झालेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. पावसाळ्याच्या दिवीसात रस्त्याने
चालणे मुश्किल झाले. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वेळा निवेदने देण्यात आले मात्र संबंधित विभागाने याची दखल घेतली नाही. रस्त्याच्या मागणीसाठी आज या परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे नगर रोड परिसर दणाणून गेला होता. विद्यार्थ्यांसह या भागातील नागरीकही या आंदोलनात सहभागी झाले होते.
चौकट
पालवण रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ध्वजारोहन करू देणार नाही-वरेकर
नगररोड ते पालवन चौक हा रस्ता अत्यंत खराब झाला असून लोकांना गाड्या चालविणे ,पायी चालणे कठीण झाले आहे हा रस्ता व्हावा व शासनाने ताबडतोब काम चालू करावे या मागणीसाठी धानोरा रोड परिसरात राहणारे पत्रकार नितेश उपाध्याय यांनी जिल्हाआधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आमरण
उपोषण चालू केले आहे,यांची माहिती मिळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर , तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन यांनी तातडीने भेट देऊन पत्रकार नितेश उपाध्याय यांची भेट घेऊन पाठिंबा दिला यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख गणेशभाऊ वरेकर म्हणाले की, नितेश उपाध्याय हे तुम्हाला खराब रस्तथावर चालण्याचा दररोजचा त्रास होऊ नये म्हणून आपलं घरदार सोडून उपोषणाला बसलेले आहेत या रस्त्यावर चालणे मुश्कील झाले आहे,या भागात मोठमोठ्या शाळा आहेत हजारो विद्यार्थी या रस्त्यावर ये जा करतात त्यामुळे येत्या 15 अगस्ट पर्यन्त हा निर्णय न घेतल्यास बीड जिल्हाचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना झेंडावंदन करू देणार नाही असा खणखणीत इशारा गणेशभाऊ वरेकर यांनी दिला.यावेळी तालुकाप्रमुख गोरख अण्णा सिंघन , जिल्हासहसचिव श्रीकृष्ण गायके ,माजी नगरसेवक रणजित बनसोडे , सामाजिक कार्यकर्त सतिष क्षीरसागर , सामाजिक कार्याकरते संभाजी सुर्वे ,सर्कलप्रमुख रमेश नवले , रत्नाकर येवले , यांच्यासह परिसरातील लोक,व शालेय विद्यार्थी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.