नाशिक (रिपोर्टर): राज्यातील विविध पक्षांकडून विधानसभेची जय्यत तयारी केली जात असून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गुलाबी फिवर चढल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला आज नाशिकमधून सुरुवात झाली. या यासिाठी वापरण्यात आलेल्या बसचा रंग गुलाबी आहे. तर आज या यात्रेत एक खास गीतही प्रदर्शित करण्यात आलं आहे. ही याि राज्यभरात जाणार असून सोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदानी तोफ धनंजय मुंडे हेही असणार आहेत. आज जनसंवाद यात्रेत अजित पवार म्हणाले, आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि महायुतीच्या सरकारने जे लोकहिताचे कामे केले आहेत ते जनतेसमोर मांडणार आहोत. जागा वाटपाबाबत अजितदादांनी थेट म्हटले, जिथे ज्याचा आमदार तिथे त्याच्या पक्षाचा उमेदवार राहील. कुठे तडजोड करण्याची गरज पडलीच तर तिन्ही पक्षांनी तशी तयारी ठेवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसंवाद यात्रा आज नाशिकमधून निघाली. या यात्रेत जास्तीत जास्त मतदारसंघात जाऊन महायुतीचे विकासात्मक कामे लोकांसमोर मांडत महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी काम करण्याबाबत महत्व देण्यात येणार आहे. या यात्रेत अजित पवारांसोबत धनंजय मुंडे, सुनील तटकरे, छगन भुजबळ हे असणार आहेत.
अजित पवारांची नाशिमधून आज जनसन्मान यात्रा सुरु होत आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जनसमान यात्रा सुरू केली आहे. आजपासून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करत आहोत. महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना महत्त्वाच्या योजना अर्थसंकल्पात आम्ही सादर केलेल्या आहेत. त्याबद्दलची माहिती आम्हाला शेतकर्यांना बहिणींना, मुलींना, युवा वर्गाला द्यायच्या आहेत. बुधवारी अल्पसंख्यांकांसाठी मार्टीची स्थापना करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करण्याची आमची भूमिका आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेतून आम्ही पुढे जात आहोत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणासंदर्भात प्रत्येकाला जी भूमिका योग्य वाटते आहे ते ती भूमिका मांडत आहे. त्याबद्दल कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही. अनेकदा सभागृहात देखील एकमताने याबाबतचे निर्णय झाले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आहे. वेळोवेळी निर्णय घेतले होते. काही निर्णय दुर्दैवाने हायकोर्टात टिकले नाही. काही निर्णय हायकोर्टात टिकले मात्र सुप्रीम कोर्टात टिकले नाही. आमचा हाच प्रयत्न आहे की, जे काही द्यायचे आहे ते देत असताना ते समाजाला मिळाले पाहिजे. इतरांवर कुठलाही अन्याय होता कामा नये, या पद्धतीने आमचे काम सुरू असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.