पंचासमक्ष बॅनर का काढले नाही?
बीड (रिपोर्टर): बीड येथील रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. तसे बॅनर काल लावण्यात आले होते. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील बॅनर व झेंडा बीड ग्रामीण पोलिसांनी काढल्याने दलित संघटना आक्रमक झाले आहेत. आज दुपारी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन पंचासमक्ष बॅनर आणि झेंडा का काढला नाही? असा प्रश्न उपस्थित करत दोषींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बीड येथील रेल्वेस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले व तसे बॅनर त्याठिकाणी लावण्यात आले होते. त्यासोबतच झेंडाही लावण्यात आला होता. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बॅनर आणि झेंडा काढण्यात आल्याने दलित संघटना आक्रमक झाले. आज जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेण्यात आली. अप्पर पोलीस अधिक्षक यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पंचासमक्ष झेंडा आणि बॅनर का काढण्यात आला नाही? असा प्रश्न उपस्थित करत झेंडा आणि बॅनर काढून महापुरुषाचा अवमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी दोषींविरोधात कारवाई करावी, नसता लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या वेळी अनेकांची उपस्थिती होती.