बीड (रिपोर्टर): रोजगार हमी योजनेमार्फत कोदण्यात येणार्या विहिरींसाठी पाच लाक रुपये अनुदान दिले जात होते मात्र अनुसुचीत जाती-जमाती या घटकातील शेतकर्यांसाठी डॉ. आंबेडकर स्वावलंब योजनेतून विहीरीसाठी योजना आहे. यासाठी दोन लाख पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येत होते मात्र यातून विहिरीचे खोदकाम आणि बांधकाम होत नव्हते. तब्बल वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी 2 लाख 50 हजार रुपयेऐवजी 4 लाख अनुदान दिले आहे.
त्यासोबतच जुनी विहीर बांधकामसाठी 50 हजारऐवजी 1 लाख, शेततळ्याच्या आस्तरणीकरणासाठी 1 लाख रुपये, तार कंपाऊंडसाठी एक लाख रुपये अशा स्वावलंब योजनेसाठी विविध घटकांच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ केल्याने अनुसूचीत जाती जमातीतील शेतकर्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.